ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा आदी जिल्ह्यांचे पाऊसदुर्दैव सरेना; हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा

वृत्तसंस्था

मुंबई – महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड बनला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने आधीच हाहाकार माजवला असताना हवामान विभागाने पुढचे चार दिवस तेथे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकणात अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडले. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे. तेथे पुनर्वसनाचे काम जरा कुठे पुढे सरकत आहे. त्यातच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. IMD has issued district level Heavy rainfall at isolated places warnings for period 29 Jul to 2 Aug 2021 for Maharashtra. 5th day there is no warning.



हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ठाण्यात आज आणि उद्या तर मुंबईत उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोल्हापुरात उद्या अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान अंदाज आहे.

IMD has issued district level Heavy rainfall at isolated places warnings for period 29 Jul to 2 Aug 2021 for Maharashtra. 5th day there is no warning.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात