माणसांना अनेक गरजा आहेत. अनेकांशी आपला दिवसभर संपर्क असतो. त्यात सोशल मीडियाचे अनेक प्रकार वापरले जातात. यामुळं मनामध्ये सुद्धा अनेक विचार असतात. त्यामुळं ताणतणाव निर्माण होतात. हे काम करू की ते काम करू अशा विचारात मन भरकटतं. हातून काम होत नाही. कामं अपूर्ण राहिली की ताण वाढतो. यामधून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात.If the body is tired, sleep falls, if the mind is tired, sleep falls
फुटबॉलच्या मैदानावर अनेक खेळाडू असतात. तसंच मनामध्ये अनेक विचार असतात. ज्या विचारांवर तुमच्या मनाचं लक्ष जातं, त्याला कामाचा बॉल मिळतो. बॉल असलेल्या खेळाडूला अडवण्याचं काम इतर जण करत असतात. तसंच तुम्ही करत असलेल्या कामावरील लक्ष अडविण्यासाठी विचार मनात येत राहतात. त्यांना चुकवून तुम्हाला पुढं जायचं असतं. हातातलं काम पूर्ण झालं तर गोल मारल्याचा आनंद मिळतो. मनाच्या रचनेत एका वेळेला आपण एकच काम करू शकतो. काम करताना अचानक दुसरा विचार आल्यास तो एका वेगळ्या कागदावर नोंदवून ठेवा.
थोड्या वेळानं हे काम करायचं आहे, असं आपल्या मनाला सांगून हातातल्या कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करा. असं केल्यानं मनाच्या एकाग्रतेची क्षमता वाढते. काही लोक एकावेळी अनेक कामं करताना दिसतात. त्याला मल्टिटास्किंग म्हणतात. प्रत्यक्षात ते एका वेळेला एकच काम करत असतात, मात्र एका कामाचं बटन बंद करून दुसऱ्या कामाचं बटन दाबून सुरू करण्याचा त्यांचा वेग इतरांपेक्षा प्रचंड असतो. सतत स्वीच ऑफ स्वीच ऑन केल्यामुळं मनावरचा ताण वाढतो. काम पूर्ण करण्यात आनंद आहे,
असं वारंवार स्वतःला स्वयंसूचना देत राहिल्यास काम करण्याची गती वाढते. काही कामं शारीरिक असतात, तर काही मानसिक श्रमाची. शरीर दमलं, तर झोप शांत लागते, मन थकलं तर झोप उडते. एकावेळी लक्षपूर्वक एकच गोष्ट पूर्ण केल्यास मनाचं थकणं कमी होतं आणि काम करण्याची उभारी मिळते!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App