विशेष प्रतिनिधी
“नरेंद्र मोदींची राजकीय कॉपी करून नितीश कुमार आणि विरोधक मिळवणार काय??”, हे शीर्षक राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या एका गृहीतकावर आधारित आहे. किंबहुना तशी चर्चा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजकीय वर्तुळातूनच सुरू करण्यात आली आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल अर्थात जेडीयुचे अध्यक्ष लल्लनसिंग यांनी ही चर्चा सुरू केली आहे, की नितीश कुमार हे बिहार सोडून 2024 मध्ये उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. लल्लनसिंग यांच्या या वक्तव्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील नितीश कुमार यांना फुलपूर लोकसभा मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची खुली ऑफर दिली आहे.If Nitish Kumar to contest loksabha election 2024 from phulpur, it will be a political copy of Narendra Modi… but what will he and the opposition get??
– फार तर केजरीवालांशी बरोबरी
याचा अर्थ असा की, हा मामला जर सिरीयस असेल, तर नितीश कुमार यांची ही सर्व विरोधकांमधली चतुराईची खेळी मानली जाईल. कारण बाकीचे सर्व विरोधी नेते आपापल्या राज्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात आव्हान देत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बाकीचे नेते आपापल्या राज्यात पाय रोवून केंद्रातल्या मोदी सरकार पुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्या त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मात्र दिल्ली या छोट्या राज्याबाहेर पडून पंजाब जिंकून आता ते गुजरात मध्ये मोदींना आव्हान देण्याच्या तयारीला लागल्या आहेत. केजरीवालांकडे पंजाब विजयाचा तुरा आहे. बाकी कोणत्याही नेत्यांकडे आपले राज्य सोडून इतरत्र यश मिळवल्याचे साधे पिस देखील नाही. पण नितीश कुमार हे जर खरंच बिहार सोडून उत्तर प्रदेश असल्या फुलपूर मधून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले, तर मात्र राजकीय दृष्ट्या त्यांची कदाचित अरविंद केजरीवालांची बरोबरी होऊ शकेल. कारण केजरीवाल सध्या तरी एकमेव नेते आहेत की जे स्वतःच्या राज्याबाहेर पडून इतरत्र आपले राजकीय कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
– मोदींची राजकीय कॉपी
हा झाला एक भाग… पण त्यापलिकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा इथे अधोरेखित केला पाहिजे, तो म्हणजे नितीश कुमार हे फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहून पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकीय कॉपीच तर करत आहेत. नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी गुजरात सोडून उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघ निवडला. ते आपले राजकीय कार्यक्षेत्र निश्चित केले. “मां गंगा ने मुझे बुलाया है”, अशी भावनिक साथ घातली. त्यांना दोन निवडणुकांमध्ये यश मिळाले. एका अर्थाने आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात राजकीय दृष्ट्या मजबूत पाय रोवता येतात, हे नरेंद्र मोदींनी सिद्ध केले.
– राजकीय क्लुप्ती पलिकडे काय??
मग नीतीश कुमार हे 2024 मध्ये हीच बाब विरोधकांसाठी सिद्ध करू इच्छितात काय?, की आपण आपले राज्य सोडून इतरत्र देखील राजकीय यश मिळवू शकतो!! पण हे केल्याने नितीश कुमार आणि विरोधकांसाठी नेमके साध्य काय होणार??, हा खरा प्रश्न आहे. फार तर नितीश कुमार हे इतर विरोधकांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मी पंतप्रधान पदाचे प्रबळ उमेदवार ठरू शकतात. पण त्या स्पर्धेत अरविंद केजरीवालांसारखे आपले राज्य सोडून इतर राज्यांमध्ये यश मिळवलेले नेते तर आधीच उभे ठाकले आहेत!!… मग नितीश कुमार यांचे नेमके वैशिष्ट्ये तरी काय राहील?? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या संपूर्ण देशात लोकप्रियता लाभलेल्या करिष्माई नेत्याला टक्कर देणे हे केवळ एखादी राजकीय क्लुप्ती लढवून शक्य आहे का??, हा खरा प्रश्न आहे.
– सरप्राईज एलिमेंट नव्हे
नरेंद्र मोदींनी गुजरात मधून वाराणसीत येणे हा खरंच त्यावेळी राजकीय धक्का होता. ते एक सरप्राईज एलिमेंट होते. पण आता नितेश कुमार फुलपूर मधून निवडणूक लढवणे हे सरप्राईज एलिमेंट उरणार आहे का?? लोक तर नितीश कुमार यांनी मोदींची कॉपी केली असेच म्हणण्याची शक्यता आहे ना??
– विरोधक सिरियस आहेत??
म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सिरियस आव्हान उभे करायचे असेल तर खऱ्या अर्थाने सिरीयस राजकीय खेळी केली पाहिजे. केवळ आपले राज्य सोडून इतर राज्यातला फुलपूर सारखा दोन पंतप्रधान दिलेला मतदार संघ निवडणे यातून चटपटीत बातम्या होतील. पण त्यापलिकडे विरोधकांना अपेक्षित असणारा परिणाम साधला जाईल का??, हा खरा प्रश्न आहे आणि याचे उत्तर सर्व विरोधक एकत्र येऊन सिरिअस राजकीय खेळी करतील की नॉन सिरियस राजकीय क्लुप्त्या लढवत राहतील, यावर अवलंबून आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App