प्रतिनिधी
मुंबई – ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकीय संन्यास घेईन, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. त्यावर सोशल मीडियापासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यापैकी एक आहेत. If Fadnavis retires, it will be a great loss to BJP and the people
देशात आणि राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. फडणवीस हे त्यापैकी एक आहेत. त्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भारतीय जनता पार्टीचे आणि जनतेचेही मोठे नुकसान होईल, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपाने राज्यभर चक्का जाम आंदोलन केले.
याच आंदोलनात नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली होती. इतकेच नाहीतर सत्ता द्या. तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन; नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, असा दावाही केला. फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यासाच्या दाव्याचा राऊतांनी समाचार घेतला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचे कौतुक आज भाजपा करीत आहे, पण ओबीसींचे नेते बावनकुळे यांच्या आमदारकीचे तिकीट कापून ‘ओबीसी’ नेतृत्वाचे पंख कापणारे हात कोणाचे होते, हेसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या!,” असा टोलाही राऊतांनी भाजपाला लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App