माणूस हा गोष्टीवेल्हाळ असतो. त्यामुळे त्याला गोष्टी ऐकायला मनापासून आवडते. मात्र या गोष्टींचा तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी उपयोग केला तर फायदा असतो. आपण विविध प्रकारच्या बोधकथा ऐकत असतो. पण यातील अनेक गोष्टी आपण ऐकून सोडून देतो. पण त्या एकाग्र चित्ताने ऐकल्या तर त्या कथांचे मोल कळते. अन्यथा आपण ती कथा ऐकण्यात घालवलेला वेळ व्यर्थ जातो. गोष्ट ऐकण्यात वेळ घालवणे आणि तीच गोष्ट ऐकताना एकाग्र होऊन वेळ घालवणे या दोन्ही प्रकारात वेळ तर गेलेला असतोचIdentify the true signs of personality development and change yourself accordingly
पण दुसर्याच प्रकारात एकाग्र झाल्याने वेळेचा सदुपयोग होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे एक सूत्र आपल्याला गवसलेले असते. एकाग्र होऊन गोष्ट ऐकण्यात वेळ खर्ची घालणे म्हणजेच क्रिटिकल लिसनिंग. दोन्ही प्रकारात लिसनिंग आहेच पण दुसर्याघ प्रकारचे लिसनिंग हे एकाग्रतेमुळे क्रिटिकल झाले आहे. ते क्रिटिकल आहे म्हणूनच एकाग्र चित्ताने गोष्ट ऐकणे हे उपयुक्त ठरले आहे.
शाळेत लिहायला आणि वाचायला शिकवले जाते. म्हणजेच लिखाणाचे आणि वाचनाचे कौशल्य शिकवले जाते पण श्रवणाचे कौशल्य शिकवले जात नाही.खरे तर आपण वाचनातून जसे ज्ञान प्राप्त करीत असतो तसेच श्रवणातूनही प्राप्त करीत असतो. किंबहुना आपल्याकडे होणारा ज्ञानाचा साठा वाचनापेक्षा श्रवणानेच अधिक जमा झालेला असतो.
पण ज्ञान साठवण्याचे हे कौशल्य विकसित करणे फार महत्त्वाचे असते हे कोणाला समजत नाही.आपण वाचन किंवा श्रवणच करीत आहोत पण दुसर्याह प्रकारात एकाग्रता मिसळलेली आहे. किंबहुना या एकाग्रते मुळेच दुसरे श्रवण हे उपयुक्त ठरले आहे. म्हणजेच कोणतीही गोष्ट वाचताना किंवा ऐकताना एकाग्रतेने वाचावी किंवा लिहावी हे व्यक्तिमत्त्व विकासाचे इंगित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more