सोशल मीडियातील कोट वापरून निराधार प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर टीका होतेय. त्यामुळे मंडळाने चूक मान्य करत या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक गुण देण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा (HSC) इंग्रजी विषयाचा पेपर नुकताच झाला.या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांच्यामुळे एक गुण जास्त मिळणार आहे! ‘रतन टाटा’ यांच्यावर आधारित चुकीचा प्रश्न विचारण्यात आला होता .या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न ज्या विद्यार्थ्यांनी केलाय, त्या सर्वांना एक अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतलाय. HSC EXAM 2022: Wrong question asked by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education … Now students will get extra marks due to Ratan Tata ..
बारावीच्या इंग्रजी भाषेच्या परीक्षेत’सिम्पल सेन्टेन्स तयार करा’ (Simple Sentence) असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. वाक्य तयार करण्यासाठी बोर्डाने टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा एक ‘कोट’ (quote) दिला होता. पण मूळात हा ‘कोट’ रतन टाटा यांचा नव्हता. खुद्द रतन टाटा यांनीच संबंधित ‘कोट’ हा त्यांचा नसल्याचं काही वर्षांपूर्वी स्पष्ट केलं होतं. पण बोर्डाची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी सोशल मीडियाच्या आधारे प्रश्न काढला होता. त्यामुळे बोर्डाला तोंडघशी पडावं लागलं. संबंधित प्रश्न चुकीचा असल्याची तक्रार काही जणांनी केली होती. त्यानंतर संबंधित चूक मंडळाच्या सुद्धा लक्षात आली, व ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न उत्तरपत्रिका सोडवताना केला, त्यांना एक गुण दिला जाईल, असा निर्णय बोर्डाने घेतला.
‘I don’t believe in taking right decisions, I take decisions and make them right’ हा कोट सोशल मीडियात गेल्या काही वर्षांपासून रतन टाटा यांचा कोट म्हणून सगळीकडे फिरतो आहे. त्याचा अर्थ “मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही, मी निर्णय घेतो आणि त्याला योग्य करतो,” असा होतो. यावर आधारित बारावीच्या इंग्रजीच्या पेपरला प्रश्न विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी रतन टाटा यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा कोट त्यांचा नसल्याचे स्पष्ट केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App