कोरोनाच्या सध्याच्या आर्थिक तंगीच्या काळात पैशांचे मोल प्रत्येकाला पुन्हा एकदा कळले आहे यात शंका नाही. मात्र अजूनही अनेकदा घरात मुलांकडून पैशांची वारेमाप उधळपट्टी सुरु असते. आर्थिक प्रतिसाद आणि वर्तणुकीच्या आधारावर पालकांचे तीन गटांत वर्गीकरण करता येते. यातील काही पालक असे असतात ते मुलांना काहीही मागा देणारच असे असतात. मुलं कशाची मागणी करीत आहेत,How to treat your children sparingly
याच्याशी काहीही कर्तव्य न ठेवता मुलांनी मागताक्षणी त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करणारे किंवा तसा प्रयत्न करणारे पालक या गटात मोडतात. दुसरा गट असतो तो आत्ता नाही-नाही म्हणजे नाही असे म्हणणारा. या गटातले पालक म्हणजे, मुलांनी कधीही, काहीही मागितले तरी त्यांचं एकच उत्तर ठरलेलं असतं, नाही किंवा आता नाही. आणि पालकांचा तिसरा एक गट असतो तो असे म्हणत असतो की विचार कर, मग माग. आपण जी मागणी करतो आहोत, त्या वस्तूची खरोखर आपल्याला गरज आहे का, असा विचार करण्याची सवय आपल्या मुलांना लावणारे पालक या गटात मोडतात.
असे पालक आपल्या मुलांना संबंधित वस्तू आपल्या बजेटमध्ये कशी बसवता येईल, असा विचार करायलाही शिकवतात. आपल्या घरासह आपल्या आजूबाजूला अशा प्रकारे विचार करणारे अनेक पालक आपल्याला दिसतील व भेटतील. अशा वेळी तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारात मोडता याचा मनाशी विचार करा. या प्रश्नाचे शक्य तितके प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यातील पहिल्या गटातील पालक मुलांना लाडाने साऱ्या वस्तू विकत देतात त्यामुळे त्यांना काटकसरीची कल्पनाच येत नाही.
तर दुसऱ्या गटातील पालक मुलांच्या मनावर नकारात्क भावना रुजवतात. त्यामुळे याचा सुवर्णमध्य साधत प्रत्येकाने तिसऱ्या गटात राहण्याचा प्रयत्न कसोशीने करायला पाहिजे. कारण यामध्ये आपण मुलांवर कळत नकळत पैशांचा वापर काटकसरीने व योग्य रितीने वापर करण्याचा संस्कार करीत असतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App