पुन्हा इंस्टाग्रामवरील मैत्रीचे भयानक वास्तव !मुंबईत वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

    • एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे . एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार  केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडितेचं वय अवघं 16 वर्ष इतकं आहे. संबंधित घटना ही 31 मे च्या रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत .या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडिया वरील मैत्रीचे भयानक वास्तव समोर आले आहे .Horrible reality of friendship on Instagram again! Gang rape of a minor girl at three places in one night on the occasion of a birthday party in Mumbai

काय घडले ?
मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी 16 वर्षाच्या मुलीचे कुटुंबीय मालाड पश्चिम येथील पोलिस ठाण्यात पोहोचले. ही मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी ताबडतोब अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि मुलीचा शोध सुरू केला. पण दुपारी उशीराच ती मुलगी स्वतः घरी परत आली.तेव्हा ती खूप घाबरलेली दिसत होती.

महिला पोलीस अधिकारीने चौकशी केल्यानंतर संबंधित प्रकार उघड

तिच्या आई-वडिलांनी ती कुठे होती, काय झाले? असे अनेक प्रश्न विचारले . मात्र, तिने काहीही सांगितलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याने तिच्या आई-वडिलांनी अखेर पोलिसांना मुलगी घरी परतल्याची माहिती दिली. त्यानंतर एक महिला अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह तिच्या चौकशीसाठी घरी दाखल झाली. मुलगी सुरुवातीला काहीच बोलली नाही. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन आणि शांत केल्यावर मुलीने सर्व काही सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुलीच्या इन्स्टाग्रामवर काही मित्र होते. त्यापैकी एका मित्राने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. त्याने या पार्टीसाठी मुलीलादेखील बोलावलं होतं. ते सर्व मढ परिसरातील हॉटेलबाहेर भेटले. त्यांनी तिथे वाढदिवस साजरा केला. ते त्या ठिकाणी गाडीतून पोहोचले होते. त्यांनी केक कारमध्ये ठेवून वाढदिवस साजरा केला.

वाढदिवस साजरा केल्यानंतर मुलीच्या दोन इन्स्टाग्राम मित्रांनी  तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिथून ती   मुलगी मालाड भागातील एका मित्राच्या घरी गेली. पण येथेही त्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी तिथल्या घरातून कसंबसं बाहेर पडली. पण ती पुन्हा तिच्या घरी गेली नाही. ती आणखी एक  मित्राच्या घरी गेली. इथेही पुन्हा तिच्यावर मित्राने बलात्कार केला.मित्रावर विश्वास ठेवत तीने 3 ठिकाणी आधार शोधला मात्र तीनही ठिकाणावर तीच्या विश्वासाच्या चिंध्या झाल्या .

आरोपींना अटक

16 वर्षांच्या पीडित मुलीसोबत 18 ते 23 वर्षांच्या 4 आरोपींनी बलात्कार केला. हे सर्व मित्र इंस्टाग्रामवरचे आहेत. बलात्कार न करणार्‍या दोन इतर आरोपींनी संबंधित घटना पाहिलेल्या आहेत.

पोलिसांनी ह्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण ते फरार असल्याने अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. इतर आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि पोक्सोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Horrible reality of friendship on Instagram again! Gang rape of a minor girl at three places in one night on the occasion of a birthday party in Mumbai

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub