विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातले. अशावेळी आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे महाराष्ट्रात होम आयसोलेशन (Home Isolation) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा जास्त आहे तिथे होम आयसोलेशन हे १०० टक्के बंद करण्यात आलं आहे. याबाबतचा निर्णय आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे.आता यापुढे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याला जरी लक्षणं नसली तरीही त्याला कोव्हिड केअर सेंटरमध्येच राहावं लागणार आहे.Home isolation Ban: Home isolation closed in ’15’ district of Maharashtra, will have to go to Covid Care Center; Information from Health Minister Rajesh Tope
या जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद :
कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आता होम आयसोलेशन पूर्ण बंद करण्यात येणार आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री?
ज्या १८ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा जास्त आहे सरासरीपेक्षा, त्या जिल्ह्यांच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. एक म्हणजे होम आयसोलेशन हे १०० टक्के बंद करा आणि कोव्हिड केअर सेंटर CCC वाढवा. सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट करा.’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गावागावांमध्ये कोव्हिड केअर सेंटर वाढविण्याचे निर्देश हे केंद्र सरकारनेसुद्धा दिले आहेत. म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातूनसुद्धा १५व्या वित्त आयोगाची जो निधी ग्रामीण ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध आहे त्यातून २५ टक्के खर्च हा कोव्हिड केअर सेंटर उभा करण्यासाठी म्हणजे २५ ते ३० बेड निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. ही महत्त्वाची सूचना या निमित्ताने देण्यात आली आहे.’ असं राजेश टोपे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App