विशेष प्रतिनिधी
मनाली – तिसऱ्या लाटेचे संकट असताना पर्यटकांकडून होणारा हलगर्जीपणा रोखण्यासाठी हिमाचल प्रदेशातील मनाली येथे कडक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मास्क न घालणाऱ्या पर्यटकास पाच हजाराचा दंड किंवा ८ दिवसाचा तुरुंगवास अशी तरतूद करण्यात आली आहे. Himachal Pradesh govt. tights covid rules
गेल्या काही दिवसांपासून हिमाचलच्या अनेक भागात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. मनाली, कुलू, धर्मशाला, सिमला आदी ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेलही फुल्ल झाले आहेत. सोशल डिस्टन्सिग आणि मास्कच्या नियमांचे पालन होत नसल्याने संसर्गाचा प्रसार होण्याची भीती वाढत चालली आहे.
त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांना जबर दंड आकारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांतच ३ लाखांचा दंड वसूल केला आहे. मास्क न घातल्यास पाच हजार रुपये किंवा ८ दिवसाचा तुरुंगवासाची शिक्षा होवू शकते.
हिमाचल, उत्तराखंड येथील मनाली, मसुरी येथे पर्यटकांची होणारी गर्दी पाहता केंद्र सरकारने पर्यटनस्थळी निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात वारंवार सूचना दिल्या जात असून नियमांचे पालन होत नसल्यास निर्बंध पुन्हा लागू होवू शकतात, अशी शक्यता वर्तविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App