‘प्रोनिंग’: आरोग्य मंत्रालयाचे कोविड रूग्णांसाठी खास घरगुती उपचार ; अशी वाढवा ऑक्सिजन पातळी ; जाणून घ्या सविस्तर

  • कोरोनापासून बचावासाठी जगभरात अनेक प्रकाराचे उपाय केले जात आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे मृतकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात प्रोनिंग पद्धत याबद्दल देखील खूप चर्चा होत आहे. ही पद्धत अनेक ठिकाणी वापरण्यात येत आहे.

  • जागतिक आरोग्य संस्थेने देखील 12 ते 16 तासापर्यंत प्रोनिंग पद्धत वापरण्याविषयी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ही पद्धत मुलांसाठी देखील वापरता येऊ शकते परंतू योग्य आणि सुरक्षित पद्धत अमलात आणण्यासाठी तज्ञांची आवश्यकता असते.

  • या पद्धतीत रुग्णाला पोटावर झोपण्यास सांगितलं जातं. जाणून घ्या काय आहे ही पद्धत का याचा वापर करण्याची गरज भासत आहे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:कोरोनावर घरीच उपचार करत असणाऱ्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर काय करायला हवं याची माहिती देण्यात आली आहे.कोरोनाची लागण झाल्यानंतर मोठ्या संख्येने कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, परंतु देशभरात ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे बरेच रुग्ण आपला जीव गमावत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी श्वास घेण्याच्या (proning) काही सोप्या पद्धती सुचविल्या आहेत. प्रोनिंग प्रक्रियेने कोरोना रूग्णांच्या ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.Health ministry advises proning at home for Covid-19 patients with breathing troubles | All you need to know

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. वेगानं कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत असून गुरुवारी दिवसभरात देशात 3 लाख 32 हजारांहून अधिक रुग्ण सापडले. लाखो रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. अशा रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून काय काळजी घ्यायची ते सांगितलं आहे. कोरोनावर घरीच उपचार करत असणाऱ्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर काय करायला हवं याची माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असताना आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. डॉक्टरांनी ऑक्सिजनची पातळी स्वत: चेक करून रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे की नाही हे ठरवण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, यामध्ये रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, ते कोरोनाचे एक लक्षण असून त्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि स्वस्थ वाटण्यासाठी पालथं झोपणं हे मदतीचं ठरतं. जर ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असेल तर घरी असलेल्या रुग्णाने पोटावर पालथं झोपावं. यावेळी तोंड उघडं ठेवावं. तुम्हाला हे करत असताना चार किंवा पाच उशा लागतील. एक उशी मानेखाली, एक किंवा दोन छातीखाला आणि एक मांडीखाली आणि एक गुडघ्यांच्याखाली ठेवावी लागेल.

पालथं झोपल्यानंतर तुम्हाला दर तीस मिनिटाला स्थिती बदलावी लागेल. यामध्ये पोटावर झोपल्यानंतर डाव्या कुशीवर आणि उजव्या कुशीवर झोपा. त्यानंतर पुन्हा झोपण्याआधी काही वेळ बसून राहा. त्यानंतर पुन्हा पोटावर पालथं झोपा. तुम्ही पालथं झोपत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

संशोधन :

अमेरिकन थोरॅसिक सोसायटीने चीनच्या वुहानमधील झियान्टेन हॉस्पिटलमध्ये फेब्रुवारी महिन्यात एआरडीएस असणारे 12 कोविड रुग्णांवर अभ्यास केला. या अभ्यासानुसार, प्रोन पोझिशनमध्ये असणार्‍या लोकांमध्ये फुफ्फुसांची क्षमता जास्त होती.

कोणी टाळावं?

  1. गर्भवती असलेल्या महिलांनी हे टाळावं.
  2. DVT रक्ताच्या गाठींचा त्रास असणाऱ्यांनी करू नये.
  3. हृदयाचा विकार असल्यास अशा अवस्थेत जास्त काळ राहू नये.
  4. femur किंवा pelvic fractures असलेल्यांनी हे करू नये.

काय काळजी घ्यायची?

  1. याशिवाय जेवणानंतर तासाभरात करू नये.
  2. जितका वेळ सहन करता येतंय तेवढंच करावं
  3. वेगवेगळ्या अवस्थेत दिवसभरात 16 तासांपर्यंत करता येईल
  4. तुम्हाला दुखापत किंवा प्रेशर असेल तर त्याकडे लक्ष द्या.

Health ministry advises proning at home for Covid-19 patients with breathing troubles | All you need to know

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात