वॉकसाठी बाहेर पडलेल्या 42 वर्षीय महिलेची छेड काढल्याप्रकरणी एचडीएफसी बँकेचा मॅनेजर आणि आयटी इंजिनियरला चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 66 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांना आरोपींचा शोध लागला. HDFC Bank manager and IT engineer arrested for molesting a woman
विशेष प्रतिनिधी
पुणे : वॉकसाठी बाहेर पडलेल्या 42 वर्षीय महिलेची छेड काढल्याप्रकरणी एचडीएफसी बँकेचा मॅनेजर आणि आयटी इंजिनियरला चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 66 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांना आरोपींचा शोध लागला.
निखिल पाटील आणि परीमल जोशी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. तसेच उच्च शिक्षित आहेत. जोशी हा एचडीएफसी बँकेत मॅनेजर आहे. तर, पाटील हा नोकिया कंपनीत नेटवर्क इंजिनिअर आहे. चंदन नगर परिसरामध्ये हे दोघेही कॉट बेसिस पद्धतीने राहतात. ही घटना 2 मे रोजी घडली होती. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याकरिता दोन टीम तयार केल्या होत्या.
परिसरातील 66 सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाटीलचे फुटेज पोलिसांना मिळाले. त्याचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर स्थानिक दुकानदारांनी त्याच्या घरापर्यंत पोलिसांना पोचवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे देखील तपासात समोर आले आहे. पीडित महिला रस्त्याने चालत जात असताना आरोपींनी तिला थांबवून घाणेरडे स्पर्श केले. या महिलेने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. पोलिस उपनिरीक्षक महेश नाणेकर पुढील तपास करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App