वृत्तसंस्था
इस्लामाबाद : दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या पंजाब – हरियाणाच्या श्रीमंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तानातूनही पाठिंबा मिळतो आहे. पाकिस्तानी अभिनेता हामझा अली अब्बासी याने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. Hamza Ali Abbasi pakistani actor supports farmers agitation
“भारतात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा मनापासून पाठिंबा आहे. मला भारतातील शेतकऱ्यांबद्दल नितांत आदर वाटतो आहे”, असे आदरयुक्त ट्विट हामझा अली अब्बासी याने केले आहे.
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यावरून देशात विरोधी पक्षांनी, बॉलिवूडने आणि लिबरल्सनी गदारोळ उठविला आहे. त्यानंतरच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे ट्विट हामजा अली अब्बासी याने केले आहे.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत एक बातमी फिरली की अलिगडच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे काही विद्यार्थी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला दिल्लीच्या वेशीवर पोहोचले. परंतु, शेतकऱ्यांनी त्यांच्या सहभागावर आणि पाठिंब्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून दूर जायला सांगितले. त्यानुसार ते गेले.आता मात्र शेतकऱ्यांच्या पाठिशी थेट पाकिस्तानी अभिनेताच उभा राहिला आहे.
My heartfelt RESPECT for the protesting Farmers of India.— Hamza Ali Abbasi (@iamhamzaabbasi) December 14, 2020
My heartfelt RESPECT for the protesting Farmers of India.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App