विशेष प्रतिनिधी
ढाका : फेसबुकवर बर्याच जणांच्या मजेदार पोस्ट पाहिल्यावर लोक ‘हा हा’ इमोजी वापरतात. तथापि, हा इमोजी बांगलादेशातील मौलानाच्या दृष्टीने हराम आहे आणि या मौलानाने फेसबुकच्या ‘हाहा’ इमोजीविरूद्ध फतवा काढला आहे. बांगलादेशच्या मौलाना अहमदउल्ला यांचे सोशल मीडियावर बरेच फॉलोअर्स आहेत. HAHA !Muslim Cleric in Bangladesh Issues Fatwa Against Use of Facebook ‘😆’ Emoji to Ridicule People
बांगलादेशच्या मौलानाने फेसबुकच्या हाहा इमोजी विरोधात अजब फतवा काढला आहे. मौलाना अहमदुल्लाह असं यांचं नाव आहे त्यांनी तीन मिनिटांचा व्हीडिओ पोस्ट केला आणि फेसबुकवर लोकांची खिल्ली उडवणाऱ्या लोकांवर त्यांनी चर्चा केली.
या चर्चेनंतर काही वेळातच हा फतवा काढण्यात आला. एवढंच नाही तर हाहा इमोजी वापरणं आणि खिल्ली उडवणं हे इस्लाममध्ये हराम आहे असंही त्यांनी सांगितलं. मौलाना अहमदुल्लाह यांचा हा व्हीडिओ 20 लाख वेळा पाहिला गेला आहे. मौलाना अहमदुल्ला यांचे फेसबुक आणि यूट्युबवर 30 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
काय आहे मौलवी अहमदुल्हाह यांचा फतवा?
फेसबुकवर व्यक्त होत असताना कुणीही खिल्ली उडवण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी हाहा इमोजीचा वापर करू नये. असे करणे हे इस्लाममध्ये हराम मानले गेले आहे. जर कुणी हा इमोजी वापरून खिल्ली उडवली किंवा टीका केली तर त्याला अतिशय घाण शब्दांमध्ये उत्तर दिलं जाईल.
मौलाना अहमदुल्लाह यांनी हे म्हटलं आहे की जर फेसबुकवर तुम्ही कुणाची खिल्ली उडवण्यासाठी किंवा कुणावर टीका करण्यासाठी हाहा इमोजीचा वापर करत असाल तर हे इस्लाममध्ये पूर्णतः हराम आहे. अल्लाहला साक्ष मानून मी तुम्हाला विनंती करतो की अशा प्रकारे कुणाचीही खिल्ली उडवण्यासाठी या इमोजीचा वापर करू नका. जर तुम्ही या भाषेत एखाद्या मुस्लिम माणसावर टीका केलीत आणि त्यावर जर त्या माणसाने प्रत्युत्तर दिलं तर तो ते अशा भाषेत देईल ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असंही मौलना अहमदुल्लाह यांनी म्हटलं आहे.
हाहा इमोजी वापरू नये असं सांगणाऱ्या मौलानांचा नेटकर्यांनी निषेधही केला आहे. मौलाना यांनी काढलेला फतवा हा लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे .
मौलाना अहमदुल्लाह हे बांगलादेशी धर्मगुरू आहेत. इस्लाममध्ये आलेल्या नव्या धर्मोपदेशकांपैकी ते एक आहेत. इंटरनेटवर त्यांची बरीच चर्चा होत असते. आता फेसबुकच्या इमोजीविरोधात त्यांनी काढलेला फतवाही चर्चेत आहेत. सोशल मीडियावर अहमदुल्लाह यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App