गुजरातमधील दारुण पराभवानंतर कॉंग्रेस नेत्यांची पळापळ, प्रदेशाध्यक्ष अमित चावडा, विरोधी पक्षनेते परेश धानाणी यांचे राजीनामे


गुजरात पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर कॉंग्रेस नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. प्रदेश् कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते परेश धानाणी यांनी राजीनामे दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरातमधल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर कॉंग्रेस नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. प्रदेश् कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते परेश धानाणी यांनी राजीनामे दिले आहेत. gujarat loss congress news

गुजरातमध्ये झालेल्या विधानसभेच्या आठ पोटनिवडणुकांत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल होता. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. राहुल गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असलेले राजीव सातव गुजरातमधील कॉंग्रेसचे प्रभारी आहेत. त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी आहे. त्यांनी अद्याप राजीनामा दिला नाही. मात्र, इतर नेत्यांनी आपले राजीनामे त्यांच्याकडेच सुपूर्द केले आहेत. त्याबाबत कॉंग्रेस महिनाअखेरीपर्यंत निर्णय घेणार आहे. gujarat loss congress news

गुजरातमधील अब्दसा, कर्जन, मोरबी, गढा, धारी, लिंबडी, कपराडा आणि डांग येथे निवडणूक झाली. या आठही जागा कॉंग्रेसकडे होत्या. मात्र, येथील आमदारांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथे पोटनिवडणूका झाल्या होत्या.

या ठिकाणी जनतेने कॉंग्रेसला सपशेल नाकारले आहे. कॉंग्रेस पक्षाचे विधानसभेतील बळ कमी झाल्याने आता राज्यसभेतील जागाही गमवावी लागणार आहे. कॉंग्रेसमध्ये पळापळ सुरू असताना भाजपामध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे.

gujarat loss congress news

आठही पोटनिवडणुकीत पक्षाने विजय मिळविल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि मुख्यमंत्री विजय रुपानी यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे २०२१ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपा चांगली कामगिरी करेल, असे म्हटले जात आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात