पैसा हा शेवटी पैसा असतो व त्याला पर्याय नसतो. माणसाला आपल्या नेहमीच्या कमाईपेक्षा थोडे बहूत जादा पैसे सन्मार्गाने मिळावेत अशी इच्छा असते. फक्त त्यासाठी काय वेगळे करता येईल याचा अनेक जण विचार करीत नाहीत. जे असा विचार करतात त्यांना पैसा सहजपणे मिळू शकतो. यासाठी तुमच्याकडे भांडवल नसले तरी चालू शकते. मात्र इच्छाशक्ती व कष्ट करण्याची तयारी मात्र हवीच त्याला कोणताही पर्याय नाही. Great way to make money
नोकरी करीत असताना जोडधंदा करूनही चांगल्या प्रकारे सहजपणे पैसे मिळवता येतात. यासाठी तुम्ही विमा प्रतिनिधी म्हणून काम करणे हा पर्याय विचारात घेवू शकता. तुमचा जर जनसंपर्क दांडगा असेल तर याच्यासारखा दुसरा चांगला व्यवसाय नाही.
हा व्यवसाय किचकट व कनिष्ट वाटला तरी यात पैसे थोडे ते भरपूर मिळवण्याची ताकद आहे. बाजारात सध्या ब-याच विमा कंपन्या आहेत. त्यातील कोणत्याही एका कंपनीसाठी तुम्हाला विमा प्रतिनिधी म्हणून काम करता येते. यात विक्रीचे फार मोठे कौशल्य नसले तरी चालेल मात्र चिकाटी, प्रामाणिकपणा, संयम मात्र असायला हवा.
समोरच्याने नाही म्हटले तर, तू नही तो और सही अशी मनोवृत्ती ठेवून निराश न होता पुढे चालत जाण्याचे गुण अंगी असायलाच हवेत. आणि हे सारे गुण प्रयत्नसाध्य आहेत. विम्याचा सरासरी वार्षीक हप्ता वीस हजार ते एक लाख एवढा असतो आणि सरासरी कमिशन वीस टक्के असते. एजन्सी चालू रहाण्यासाठी किमान १२ पॉलिसी वर्षात कराव्या लागतात.
म्हणजे त्यासाठी फार काही कष्ट नाहीत. म्हणजे फक्त एजन्सी चालू ठेवली तरी वर्षाला ४८ हजार ते अडीच लाख रुपये कमिशन पहिल्या वर्षाचे होते. रिन्युअल कमिशन दर वर्षी चार टक्के याप्रमाणे वाढतच जाते. आज देशात वार्षीक एक कोटी पेक्षा जास्त कमिशन मिळवणारे शेकडो विमा प्रतिनिधि आहेत. यासाठी एक बाब प्रथम ध्यानात ठेवली पाहिजे ती म्हणजे विमा विकला जात नाही तो विकावा लागतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App