शेतकऱ्यांना यंदा उस लागणार आणखी गोड, उसाला मिळणार प्रतिक्विंटल २९० रुपये एफआरपी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी उसाची एफआरपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार उसाला २९० रुपये प्रतिक्विंटल एफआरपी मिळेल. मागील हंगामात ही रक्कम प्रतिक्विंटल २७०.७५ रुपये एवढी होती. Govt. increase FPP of sugarcane



वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, की ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीतील गळीत हंगामासाठीची एफआरपी १० टक्क्यांवरील उताऱ्यावर आधारित असेल. त्यापेक्षा वाढीव उताऱ्यासाठी दर ०.१ टक्के वाढीमागे २.९० रुपये प्रतिक्विंटल प्रिमियम मिळेल.

तशाच प्रकारे, साखर उताऱ्यात होणाऱ्या दर ०.१ टक्का घटीमागे एफआरपीमध्ये २.९० रुपये प्रतिक्विंटल घट होईल. मात्र, किमान उताऱ्यासाठी ९.५ टक्क्यांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यापेक्षा कमी उतारा आला तरीही ऊस उत्पादकांना २७५.५० रुपये प्रतिक्विंटल एफआरपी मिळेल.

Govt. increase FPP of sugarcane

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub