प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यात ज्या राजकारणावरून घमासान माजले त्या १२ संभाव्य आमदारांची यादी ही स्वतः राज्यपालांनी आपल्याच जवळ ठेवल्याची माहिती समोर आली आहे. Governor bhagat singh koshiyari kept 12MLC list in office; claims RTI
गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वाद पेटलेला आहे. मध्यंतरी यादी गहाळ झाल्याची माहिती समोर (RTI) आली होती. पण, ही यादी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडेच असल्याची माहिती समोर आली आहे. आयबीएन लोकमतने ही बातमी दिली आहे.
ठाकरे – पवार सरकारने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ जणांची नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. ती यादी माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली होती.
मात्र, आज १५ जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर झालेल्या सुनावणीत ती यादी राज्यपालांनी स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगण्यात आले. आता राज्यपालांने निर्णय घेतल्यावरच माहिती मिळेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपालांनी गेल्या ८ महिन्यांपासून राज्य सरकारने पाठवलेल्या यादीवर कोणताच निर्णय घेतला नसल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App