नाशिक : शरद पवारांच्या बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम झाला. त्यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या देणगीतून विद्या प्रतिष्ठानने शरद पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभारले. त्याचे उद्घाटन शरद पवारांनी गौतम अदानी यांच्या हस्ते केले. या कार्यक्रमाला अदानी आले, त्यावेळी बारामतीच्या विमानतळावर अजित पवारांनी त्यांचे स्वागत केले, तर रोहित पवारांनी ड्रायव्हर बनून त्यांची गाडी चालविली. Gautam adani brother
– संजय राऊतांचा राजकीय बॉम्बस्फोट
पण एकीकडे गौतम अदानींचा बारामतीत कार्यक्रम सुरू असतानाच दुसरीकडे मुंबईत संजय राऊत यांनी मोठा राजकीय या बॉम्बस्फोट केला. शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्याच भावाचा सहभाग होता, पण आपला पक्ष फोडणाऱ्या व्यक्तीचे स्वागत पवारांना करायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोला संजय राऊत यांनी मारला. गौतम अदानी आणि पवारांचे कौटुंबिक संबंध आहेत. राजकीय संबंध नाहीत. पण याच गौतम अदानींचाच भाऊ पवारांच्या पक्ष फोडण्यात सामील होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे, अशी मखलाशी संजय राऊत यांनी केली. मुंबईत टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती आले. पण अदानी ज्या प्रकारे मुंबई गिळंकृत करत आहेत, आणि त्यांना ज्या प्रकारचे प्रोत्साहन देण्यात येत आहे ते मराठी माणसासाठी फार घातक आहे, असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला.
– पवारांची गोची
महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुका सुरू असताना आणि त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कुठलाही पक्ष जवळ करायला तयार नसताना संजय राऊत यांच्या सारख्या पवार शिष्याने मोठा राजकीय गौप्यस्फोट केल्याने पवारांची गोची झाली. कारण आत्तापर्यंत फक्त काँग्रेस नेते आणि विशेषतः राहुल गांधी हेच अदानी यांच्या संदर्भात वेगवेगळे आरोप करत होते. पण आता त्यामध्ये पवार शिष्य संजय राऊत सुद्धा उतरल्याने पवारांच्या गोटातूनच त्यांच्यावर राजकीय गोळीबार सुरू झाला की काय??, असा संशय बळावला.
– गौतम अदानींचे चार भाऊ
पण संजय राऊत म्हणाले, त्याप्रमाणे खरंच गौतम अदानींच्या भावाने राष्ट्रवादी फोडायला मदत केली असेल, तर ती नेमक्या कुठल्या भावाने??, असा सवाल समोर आला. कारण गौतम अदानी यांना एकच भाऊ नाही. त्यांना चार भाऊ आहेत. ते सगळे बिजनेसमन आहेत. यापैकी विनोद अदानी हे सर्वात मोठे असून ते NRI आहेत. राजेश अदानी हे गौतम अदानींच्या कंपन्यांचे “ऑपरेशन्स हेड” म्हणून काम पाहतात, तर महासुख अदानी हे “स्ट्रॅटेजिक हेड” म्हणून काम पाहतात. या व्यतिरिक्त मनसुखभाई अदानी हे देखील भाऊ आहेत. ते देखील बिझनेसमन आहेत.
– नेमका पक्ष फोडला कुणी??
गौतम अदानी यांच्या चार भावांपैकी विनोद अदानी आणि महासुख अदानी हे सर्वाधिक चर्चेत राहिले. कारण विनोद हे परदेशातला सगळा कारभार पाहतात, तर महासुख अदानी हे पडद्यामागून सगळा कारभार बघत असतात. गौतम अदानी यांच्यासह हे सगळे पाच भाऊ सगळ्यांशी चांगले संबंध राखून असतात. त्यामुळे गौतम अदानींच्या नेमक्या कुठल्या भावाने कुठल्या मार्गाने पवारांचा पक्ष फोडला??, हा सवाल समोर आला. संजय राऊत यांनी कुठल्याही भावाचे नाव न घेता तो “सस्पेन्स” कायम ठेवला. पण पवारांच्या भोवती नवे संशयाचे वातावरण निर्माण करण्यात संजय राऊत यशस्वी ठरले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App