Fight against covid19 : १२० वर्षांच्या आजीच्या अथक प्रयत्नांमधून अख्ख्या गावाचे लसीकरण यशस्वी; भारतीय सैन्य दलाकडून दखल

वृत्तसंस्था

जम्मू – कोरोनाच्या प्रकोपात मोठ्या शहरांमधून मास्क वापरण्यास टाळाटाळीच्या आणि नियमावली भंग केल्याच्या बातम्या येत असताना छोट्या गावांमधून प्रेरणादायी बातम्या येत आहेत. Gar Katiyas, in Tehsil Dudu of Udhampur J&K entire village to make the COVID19 vaccination drive a huge success: Govt of India



अशीच एक बातमी जम्मू काश्मीरमधून आली आहे. राज्याच्या उधमपूर जिल्ह्यातील दोडू तालुक्यातील गार कटियास या छोट्या गावातील १२० वर्षांची आजी धोली देवी यांच्या अथक प्रयत्नांमधून संपूर्ण गावाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली असून गावाला कोरोनापासून मुक्त ठेवले आहे. गावाची लोकसंख्या साधारण दीड हजार आहे. धोली देवी यांनी गावातील घराघरात जाऊन तसेच पंचायतीची मदत घेऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती केली. महिला – पुरूषांना लस टोचून घेण्यास उद्युक्त केले.

त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन गावात प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झाले आणि गाव कोरोनापासून मुक्तता अनुभवत आहे. धोली देवींच्या प्रयत्नांची दखल भारतीय सैन्यदलाने घेतली असून लष्कराच्या नॉदर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी गार कटियास गावात जाऊन धोली देवींची भेट घेऊन त्यांचा खास सत्कार केला. या वृद्ध मातेचे प्रयत्न संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले.

Gar Katiyas, in Tehsil Dudu of Udhampur J&K entire village to make the COVID19 vaccination drive a huge success: Govt of India

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात