विशेष प्रतिनिधी
विघ्नविनाशक गणेशाचे आगमन झाले आहे. घरोघरी गणेशपूजनाची तयारी करताना एकदा शूचिर्भूत होऊन पूजेचे ताट तयार केले, की निम्मी तयारी पूर्ण होते. गणपती बसवताना पूजेच्या ताटाची तयारी नेमकी कशी करावी, ताटात कोणकोणते घटक असले पाहिजेत, याची माहिती घेऊ. Ganpati Bappa’s worship plate is very different,
गणेशपूजनाची उपकरणी चांदीची किंवा तांब्याची असावीत, असे शास्त्रात सांगितले आहे. पूजाविधीसाठी कलश, ताम्हण, पळीपंचपात्री ही उपकरणे लागतात. त्याबरोबरच निरांजन, उदबत्तीचे घर, समई, धूपदाणीही आवश्य्क आहे. हल्ली अतिशय सुंदर मीनावर्क केलेले पूजेचे ताटही बाजारात मिळते. आपल्या आवडीनुसार ताट निवडून पूजेची दोन ताटे तयार करावीत. एका ताटात पूजासाहित्य ठेवावे आणि दुसरे ताट फुले, पत्री यांसाठी राखून ठेवावे. ही ताटे स्वच्छ धुऊन, पुसून घ्यावीत. पूजा साहित्य ठेवण्याचे ताट मोठे असावे. त्यात हळद, कुंकू, गुलाल, बुक्काा, अष्टगंध, अक्षता, शेंदूर, कापूस वस्त्र (गेजवस्त्र), कापूर, धूप, सुपाऱ्या, खारीक, बदाम व पंचामृत (दूध, दही, तूप, मध व साखर एकत्र करून तयार केलेला पदार्थ) ठेवलेल्या छोट्या छोट्या वाट्या ठेवाव्यात.
पंचामृताच्या वाटीत छोटा चमचा घालून ठेवावा. दूधसाखरेच्या नैवेद्याची वाटीही ठेवावी. त्याबरोबरच पूजेच्या ताटात जानवी जोड, उदबत्ती, नारळ व अत्तराची छोटी बाटलीही ठेवावी. तुपात भिजवलेली फुलवात किंवा मेणवात घालून निरांजन ठेवावे. तेलवात घालून समई ठेवावी. सुटी नाणीही लागतात. त्यामुळे त्यांचा समावेशही पूजेच्या ताटात आवर्जून करावा. रांगोळी पूजेच्या ताटात ठेवली जात नाही. पण रांगोळी काढल्याशिवाय पूजाविधी सुरू करीत नाहीत.
पूजेचे दुसरे ताट आहे फुले व पत्रीचे. गणपतीच्या पूजेला विड्याची 15 पाने लागतात. त्याचबरोबर मोगरा, माका, बेल, पांढऱ्या किंवा हिरव्या दूर्वा, बोरीचे पान, धोत्र्याचे पान, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुनसादडा, विष्णूक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्तिपत्र ही 21 प्रकारांची पत्री म्हणजेच पाने लागतात. ही पाने व फुले मावतील, असे मोठे ताट घ्यावे. लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब आणि पारिजातक ही फुले पूजाविधीत सांगितली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App