WATCH : कल्याणमधून गणपती बाप्पा निघाले आफ्रिकेला; दोन दिवसात पाठविणार ;गणपती बाप्पा मोरया


मुंबई : एकीकडे महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवावर गेल्या वर्षापासून निर्बंध लादलेत. मात्र विविध देशांमध्ये आजही गणपती उत्सव साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्या आधीच कल्याणमधून थेट आफ्रिकेमध्ये एक फुटाची घरघुती गणपतीची मूर्ती आफ्रिकेला रवाना होणार आहे. Ganpati Bappa left Kalyan for Africa

गेल्या आठ वर्षापासून वायलेनगरमध्ये मूर्तिकार निलेश नखाते यांचा गणपतीचा करखाना आहे. दरवर्षी त्यांच्या कारखान्यातून परदेशात गणपती बाप्पाची मूर्ती जात असते. या वर्षी एक फुटाची शाडू मातीने बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती आफ्रिकेतील नायजेरियातून मागणी करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मूर्ती वेळेवर पोचेल की नाही या भीतीने मूर्तिकार निलेश नखाते यांनी दोन महिने अगोदरच बाप्पाची मूर्ती बनवून नायजेरिया या ठिकाणी विमानाने पाठवण्याची तयारी केली आहे. Ganpati Bappa left Kalyan for Africa

  •  गणपती बाप्पा निघाले परदेशात
  •  वायलेनगरमध्ये मूर्तिकार निलेश नखाते यांचा उपक्रम
  •  यंदा एक फुटी मूर्ती आफ्रिकेत जाणार
  •  दोन महिने अगोदर नायजेरियाला विमानाने रवाना
  • मागच्या वर्षी लंडनला बाप्पाची मूर्ती गेली

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण