वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश याचे आज घरोघरी आगमन झाले.’ गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने वातावरण मंगलमय झाले. Ganesh Festival started all over the state; Idols of Lord Ganesha arrived in Houses
महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणेशात्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी बच्चे कंपनीची लगबग सुरू होती. गणेशमूर्तींची मुहूर्तावर संपूर्ण राज्यात विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
मंगलमय आरतीचे सूर अनेक घरात ऐकू येत होते. अनेक ठिकाणी गणेशाचे थाटात आगमन झाले तर काही ठिकाणी आज दुपारनंतर होत आहे. दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा आणि सेवा भक्त मंडळी करणार आहेत. या दिवसांमध्ये गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणेश भक्त घरात, मंदिरांमध्ये आणि विविध मंडळांमध्ये गणेशाची पूजा करण्यात आली. शेंदूर, दुर्वा, नैवेद्य अर्पण करून आरती करून गणारायचे स्वागत करण्यात आले.
घरोघरी मोठ्या उत्साहात गणरायाचे आगामन
कोरोना संक्रमणाचा धोका पाहता यंदा गणेशचतुर्थी आणि अनंतचतुर्थीला मंडळांना मिरवणूक काढण्यास बंदी घातली असून जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत. त्यामुळे नियम पाळून उत्सव साजरा करावा लागत आहे. परंतु गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. घरोघरी मोठ्या उत्साहात गणरायाचे आगामन झाले असून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App