लोकशाही पध्दतीने निवडणुका घेण्याचा कितीही दावा कॉंग्रेस करत असली तरी निवडणूक प्रक्रिया कशा पध्दतीने राबविली जाते याची पोलखोल मध्य प्रदेशात झाली आहे. येथील जबलपूर जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची महासचिव म्हणून निवड झाली.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : लोकशाही पध्दतीने निवडणुका घेण्याचा कितीही दावा कॉंग्रेस करत असली तरी निवडणूक प्रक्रिया कशा पध्दतीने राबविली जाते याची मजेदार पोलखोल मध्य प्रदेशात झाली आहे. येथील जबलपूर जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची महासचिव म्हणून निवड झाली. Funny Congress election process, made BJP leader general secretary
मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या महासचिवपदी हर्षित सिंघाई यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर सिंघाई यांना अभिनंदनाचे फोन येऊ लागले. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी नऊ महिन्यांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत कॉंग्रेस सोडली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर ऑनलाईन मतदान झाले. सिंघाई यांना अठराशे मतेही मिळाली. परंतु, मार्च महिन्यात त्यांनी पक्षत्याग केला असतानाही कोणा नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या लक्षात कसे आले नाही, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App