दिल्लीत सुरू असलेल्या श्रीमंत शेतकरी आंदोलनासाठी पैसे कोठून येतात असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला आहे. त्याचे उत्तर एका बॅंकेतील खात्यातून मिळाले आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनला परदेशातून निधी मिळत असल्याचे उघड झाले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या श्रीमंत शेतकरी आंदोलनासाठी पैसे कोठून येतात असा प्रश्न संपूर्ण देशाला पडला आहे. त्याचे उत्तर एका बॅंकेतील खात्यातून मिळाले आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनला परदेशातून निधी मिळत असल्याचे उघड झाले आहे.
Funds for farmer protest from abroad to the Indian Farmers Union
पंजाबमधील एका शेतकरी संघटनेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच विदेशातून निधी घेतल्याचा आरोप आहे. आवश्यक नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असा इशारा बँकेने या शेतकरी संघटनेला दिला आहे.
पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील पंजाब आणि सिंध बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला बोलावलं आणि विदेशी मुद्रा विभागाने पाठवलेल्या एक मेल संदर्भात माहिती दिली गेली. आपल्या संघटनेला गेल्या दोन महिन्यांत ८ ते ९ लाख रुपये मिळाले आहेत. यासंबंधी माहिती घेण्यासाठी बँक अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावलं होतं. विदेशात राहणाऱ्या पंजाबी नागरिकांकडून सामाजिक कारणासाठी नियमितपणे अशा स्वरूपाची देणगी दिली जाते, असं युनियनचे सरचिटणीस सुखदेवसिंग कोकरी कलान यांनी सांगितलं.
जे भारतीय आम्हाला निधी पाठवत आहेत, ते पंजाबमधील आहेत आणि विदेशात वास्तव्याला आहेत. ते फक्त मदत करत आहेत. यात कुणाला काय समस्या आहे? त्यांचाही कायद्यांना निषेध आहे. आम्ही कोणत्याही अर्थतज्ज्ञ किंवा कमिशन एजंटची मदत घेतलेली नाही, असे किसान युनियनकडून सांगण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App