विशेष प्रतिनिधी
जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या मुद्द्यावरुन जळगावमध्ये एका व्यक्तीला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. बदाम मारहाण केल्यानंतर शिवसैनिकांनी “ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल अशी पोस्ट टाकेल त्याला असाच चौकामध्ये चोप दिला जाईल. अशी कोणतीही पोस्ट शिवसेनेच्याबद्दल आणि मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल कोणी टाकू नये, हे याद राखावं,”असा फतवा देखील जारी केला .सोबतच शिवीगाळ अन् वृद्धाला देखील मारहाण करण्यात आली .Freedom of expression
ही व्यक्ती ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेली असता तिला या पोस्टसंदर्भात जाब विचारत चित्रपटगृहाच्या बाहेरच मारहाण करण्यात आली. हा संपूर्णप्रकार जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडला.
धरणगाव येथील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली.
ही पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी आले होते. ते चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर पाळत ठेवत चित्रपटगृहासमोर त्यांना बेदम मारहाण केली. हेमंत द्वितीये यांच्याकडून शिवसैनिकांनी या पोस्टसंदर्भात माफी मागून घेतली. घाबरलेल्या हेमंत यांनी “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. त्याबद्दल मी माफी मागतो” असं म्हणत माफी मागीतली..
यावेळी हेमंत यांच्यासोबत असणाऱ्या पत्नीने, “त्यांच्याकडून चूक झालीय. पण यापुढे जेव्हा जेव्हा मला सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंविरोेधात अशी पोस्ट दिसेल तेव्हा मी त्या व्यक्तीचं नाव शिवसेना शाखेत आणून देईल, त्यावर तुम्ही काय करता बघू,” असं शिवसैनिकांना सांगितलं.
“ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल अशी पोस्ट टाकेल त्याला असाच चौकामध्ये चोप दिला जाईल. अशी कोणतीही पोस्ट शिवसेनेच्याबद्दल आणि मुख्यमंत्रीसाहेबांबद्दल कोणी टाकू नये, हे याद राखावं,” असं शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितलं.
शिवसेना जिल्हाप्रमख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App