Forced sex in marriage : पत्नीशी जबरदस्तीने शारिरीक संबंध बेकायदेशीर नाही;सेशन्स कोर्टाचा निर्णय; पतीला जामीन मंजूर

विशेष प्रतिनिधी

मुंबई:एका महिलेने तिच्या पतीविरोधात तिच्या इच्छेच्या विरोधात शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला मात्र हे कायदेशीर चौकशीचं प्रकरण नाही असं न्यायाधीशांनी स्पष्ट करत पत्नीसोबत जबरदस्तीने किंवा तिच्या इच्छेविरोधात शारिरीक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही असा निर्वाळा देखील दिला आहे .मुंबई सेशन्स कोर्टाने आरोपी पतीला जामीन मंजूर केला आहे.Forced sex in marriage: Forced sex with wife is not illegal; Sessions Court decision; Husband granted bail

मुंबईच्या सेशन कोर्टाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री घरत-

ज्या महिलेने तक्रार केली आहे त्या महिलेचं लग्न मागील वर्षी 22 नोव्हेंबरला झालं. या महिलेने तिच्या तक्रारीत हे म्हटलं होतं की लग्नानंतर पती आणि सासरच्या लोकांनी बंधनं घालायला सुरूवात केली. सोबतच टोमणे मारणं, शिवीगाळ करून पैशांची मागणीही केली.

लग्नाला एक महिना झाल्यानंतर पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती केली असाही आरोप या महिलेने केला. 2 जानेवारीला मी आणि माझा पती महाबळेश्वरला गेलो होतो तिथेही पतीने बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेले होते, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कमरेखालच्या भागात लकवा मारल्याचं सांगितलं असंही या महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.

महाबळेश्वरच्या प्रकारानंतर या महिलेने पती आणि तिच्या सासरच्या इतर लोकांविरोधात मुंबईमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर तिच्या पतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सुनावणी दरम्यान पती आणि त्याच्या घरातल्यांनीही हे सांगितलं की केले जाणारे आरोप खोटे आहेत, आम्ही हुंडा किंवा पैशांची मागणी केली नाही.

यानंतर न्यायाधीश म्हणाले की पती असल्याच्या नात्याने त्याने काहीही चुकीचं केलं नाही.जबरदस्ती शारिरीक संबंधांना काहीही कायदेशीर आधार नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे.

हे अत्यंत दुर्दैवी आहे की मुलीला लकवा मारला गेला. मात्र त्यासाठी पती आणि कुटुंबाला जबाबदार धरता येणार नाही.

 

Forced sex in marriage: Forced sex with wife is not illegal; Sessions Court decision; Husband granted bail

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात