
वृत्तसंस्था
सांगली :- एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आज सांगली तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत सांगलीत धडक मोर्चा काढला.For ST merger agitation with family in sangali
भाजपाच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातल्या एसटी बस स्थानकापासून शहरातल्या अप्पर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा निघाला. ज्यामध्ये शेकडो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.माजी आमदार भाजपा नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
सांगलीत एसटी कर्मचारी आंदोलनाचा आहेत. अनेक कर्मचारी सेवेत परतले नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र एसटी कर्मचारी अद्यापही देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
- एसटी विलीनीकरणासाठी कुटुंबीयांसमवेत मोर्चा
- सांगलीत तहसील कार्यालयावर काढला मोर्चा
- भाजपच्या नेतृत्वाखाली बसस्थानकापासून काढला
- शेकडो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले