आत्ता तुमच्यासमोर कागद पेन असेल तर लगेच तुम्हाला आयुष्यात करायच्या असलेल्या दहा गोष्टींची यादी करा व ती रोज दिसेल अशा ठिकाणी लाऊन ठेवा. या दहा गोष्टींमध्ये अगदी लहान लहान गोष्टींपासून सुरवात करून शेवटी मोठ्या गोष्टींकडे जा. यामध्ये अगदी एखादा आवडता मोबाईल फोन घेणे, आवडती बाईक घेणे, इथपासून सुरवात करून मग बाहेर कुठेतरी फिरायला जाणे, स्वतःचा बंगला बांधणे अशा मोठ्या गोष्टींकडे ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. ही यादी तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेईल आणि तुम्हाला काम करायला, पैसे वाचवायला प्रवृत्त करेल तसंच जर तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित झालात तर तुम्हाला परत योग्य मार्गावर आणण्यासाठी मदत करेल. Focus on your work
आपल्या प्रयत्नांना मिळणारे बक्षीस जर आपल्या समोर असेल तर अजून जास्त जोर लावायला आपल्याला हुरूप येतो. हे सारे करीत असताना फळाची अपेक्षा तर करायची आहे पण त्यावर लक्ष केंद्रीत न करता पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करायचे आहे. समजा आपण एखादी वस्तू विकत असू तर आपण ती जास्त प्रमाणात विकली कशी जाईल यावर जास्त भर देत असतो किंवा समजा आपण एखाद्या कोचिंग क्लासेसचे मालक असू तर आपल्या क्लासमध्ये जास्त विद्यार्थी कसे येतील याचाच आपण विचार करतो. जास्त लोकांना कसे आकर्षित करता येईल हाच आपल्या मनात विचार असतो. इथेच आपलं गणित चुकते. आपण फळावर जास्त लक्ष दिल्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होते आणि क्लास मधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि आपलं फळ सुद्धा आपल्यापासून दूर जाते. आपल्या कामावर लक्ष देऊन ते उत्तम केलं तर ग्राहक आपोआप आपल्या वस्तूकडे खेचला जाईल किंवा विद्यार्थ्यांना क्लास लावण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही.
कुठलाही बिजनेस असो व नोकरी आपल्याला यातून काय मिळणार यावर लक्ष केंद्रित केले कि संपले. तुम्ही तुमचे बेस्ट द्यायला सुरुवात करा पैशांचा ओघ आपोआप तुमच्याकडे वयात येईल. शेवटी यश म्हणजे यापेक्षा वगळे काय असते. यशाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते. यश हे सापेक्ष असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App