भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे पाच सैनिक ठार


-नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची पाकिस्तानला मोजावी लागली किंमत


विशेष प्रतिनिधी

जम्मू – पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गुरुवारी दुपारी सुरू झालेला गोळीबार शुक्रवारी सकाळपर्यंत होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले तर तीन जखमी झाले. वृत्तसंस्थेने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

Five Pakistani soldiers killed in retaliation by Indian army

सूत्रांनुसार, गुरुवारी दुपारनंतर पाकिस्तानकडून सुरू झालेला गोळीबार शुक्रवारी पहाटेपर्यंत चालू होता. या दरम्यान मोठे शस्त्रे आणि मोर्टारचा देखील वापर करण्यात आला. भारतीय लष्कराने देखील याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले. एलओसीच्या काही भागात पाकिस्तानी सैनिक सतत उकसावण्याचे काम करत आहे. गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीरचे पुंछ सेक्टर निशाण्यावर होते.

भारतीय सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानकडून अचानक गोळीबार सुरू झाला. त्यांना भारतीय नागरिकांना लक्ष्य करायचे आहे. मानकोट सेक्टरमध्ये सर्वाधिक गोळीबार झाला. येथील काही नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. आम्ही पाकिस्तानचे पाच सैनिक ठार केले तर तीन जखमी आहेत. त्यांनी अनेक नवीन बंकर बनवले आहेत. त्यांनाही उद्ध्वस्त केले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास सुमारे 2 तास जोरदार गोळीबार झाला.

Five Pakistani soldiers killed in retaliation by Indian army

1999 मध्ये युद्ध बंदीच्या उल्लंघनांबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला. पाकिस्तान या युद्धबंदी कराराचे सतत उल्लंघन करीत आहे. यावर्षी आतापर्यंत त्याने 3200 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. यात 30 नागरिक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात