कमाई अशा ठिकाणी गुंतवली पाहिजे जिकडे सर्वाधिक परतावा मिळेल. त्याचप्रमाणे ही गुंतवणूक सुरक्षितही असेल. या गुंतवणुकीवर लागणाऱ्या करावरही लक्ष देणं गरजेचं असतं. पुढील पाच ठिकाणी गुंतवणूक केल्याने नक्की फायदा होवू शकतो. सुकन्या समृद्धी योजना ही सरकारी योजना असून पूर्ण सुरक्षित आहे. १० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीच्या नावावर बँक किंवा पोस्टात खातं उघडलं जाऊ शकतं.Five Great Ways to Invest
या योजनेत गुंतवणुकीचा काळ १४ वर्ष आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर गुंतवणूक मॅच्युअर होते. या गुंतवणुकीमुळे आयकरात सूट मिळते. या योजनेमध्ये ८.१ टक्के व्याजदर मिळतो. व्याजाची गणना कपाऊंड होत असल्यामुळे परतावाही जास्त मिळतो. या योजनेमध्ये वर्षाला कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येऊ शकतात. दुसरी योजाना पीपीएफ. पीपीएफमध्ये गुंतवलेल्या रकमेवर मिळणारं व्याज टॅक्स फ्री आहे.
मॅच्युरिटीवेळी मिळणारी रक्कमही टॅक्स फ्री असते. पीपीएफवर सध्या वर्षाला ७.६ टक्के व्याज मिळतं. प्रत्येक ३ महिन्यांनंतर पीपीएफच्या व्याजाची समीक्षा होते. पीपीएफमध्ये वर्षाला कमीतकमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. तिसरा पर्याय म्हणजे लिक्विड फंड. यात बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळतं. हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे. या गुंतवणुकीमध्ये धोका कमी असतो तसच लॉक ईन पिरेड नसल्यामुळे गुंतवणुकीच्या दुसऱ्या दिवशीही पैसे काढता येतात.
चौथा प्रकार पोस्ट ऑफीस. बँकेतले व्याजदर कमी होत असतानाच पोस्टातल्या योजनांचे व्याज दरांमध्ये मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. बँकेमध्ये सध्या ६ ते ७ टक्के व्याज मिळत असताना पोस्टामध्ये ७.९ टक्के व्याज मिळत आहे. यामुळे ९ वर्षांत रक्कम दुप्पट होते.
बँकांमध्ये जास्तीत जास्त ७ टक्के व्याज मिळत असताना सरकारी बॉण्ड्समधून ७.८ टक्के व्याज मिळत आहे. त्यामुळे बँकेच्या तुलनेत सरकारी बॉण्ड्समधील गुंतवणूक लवकर दुप्पट होते. अर्थात यातील कोणत्याही पर्यायात गुंतवणूक करताना प्रत्येकाने आपली गरज व जोखीम यांचा नेहमीच विचार करायला हवा. त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शनही घ्यावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App