वृत्तसंस्था
पुणे : पुणे शहरात सकाळची न्याहारी म्हणून लोक पोहे खायला पसंत करतात. पण, अनेक विद्यार्थी आईच्या हाताची चपाती आणि चहाची खूप आठवण काढतात. आता पुण्यात किंवा महाराष्ट्रातील पहिला चहा चपाती पुरविण्याचा स्टॉल कॉलेजच्या मित्रांनी एकत्रित येऊन सुरू केला आहे. First Tea- Chapati stall in Pune by college students; breakfast problem is solved
पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. राज्य सेवा आयोग आणि अनेक विद्यार्थी पुण्यात आपलं शिक्षण घेत असतात. त्यांच्या जेवणाचा प्रश्न असतो. घरगुती मेस आहेत. सकाळचा नाष्ट्यात रोज पोहे, उडीद वडा किंवा इडलीच मिळते. चहा चपाती त्यांना मिळत नव्हती. त्यामुळे अक्षय भैमुल्य,अक्षय चव्हाण, धनश्री पाटील या विद्यार्थ्यांनी चहा चपाती पुरविण्याची कल्पना सुचली. विशेष म्हणजे त्यांना चांगला प्रतिसादही मिळू लागला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App