माझ्याजवळ भरपुर पैसा आहे, ही भावना सुखद असते. त्यातून एक वेगळा आत्मविश्वास येतो. जवळ असलेला पैसा माणसाला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातो. त्याउलट तिजोरीत आणि अकाउंटमध्ये असलेला पैशाचा दुष्काळ माणसाची झोप उडवतो, त्याला अस्वस्थ करतो. Find Multiple Sources of Income to End Money Shortages
महत्वाचे निर्णय घेताना त्याच्या मनाची अवस्था चलबिचल करायला भाग पाडतो. पैशाची टंचाई कशी भयानक असते, जवळ पुरेसे पैसे नसले की कसे शोषण होते, याचा अनुभव आपल्या प्रत्येकाने केव्हा ना केव्हा घेतलाच असेल. पैसे नसलेल्या व्यक्तिला मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य नसते.
पैसे नसलेल्या व्यक्तीच्या मताला समाजात पत नसते. माझ्याजवळ पैसे नाहीत हे एक दुःख आणि मला हवा तो मानसन्मान मिळत नाही, हे दुसरे दुःख, अशा दुहेरी कोंडीमधुन बाहेर पडण्याची ही त्याची लढाई दररोजच सुरु असते. लाखो नोकरदारांची हीच समस्या आहे.
कित्येक वर्ष नोकरी केल्यानंतरही का त्यांच्याजवळ एकदोन महीन्याच्या खर्चापेक्षा जास्त पैसे शिल्लक नसतात? जर तुम्हीही रिकामं पाकिट आणि दुष्काळग्रस्त बॅंक अकाउंट ह्यांनी परेशान झाला असाल, तर पैशाने गच्च भरलेलं पाकिट आणि बॅंकेत भरघोस उत्पन्नाचा खजिना निर्माण करण्याचे काही उपाय केले पाहिजेत. नेहमी एक बाब लक्षात ठेवा ती म्हणजे उत्पन्नाचा एकच स्त्रोत कधीही नसावा.
जे लोक आर्थिक कडकी आणि पैशाची तंगी ह्या समस्यांमध्ये नेहमी गुरफटलेले असतात, त्यांचे निरीक्षण केल्यास तुम्हाला एक गोष्ट चटकन ध्यानात येईल ती म्हणजे, पैसे मिळण्यासाठी फक्त एकाच साधनावर ते अवलंबुन आहेत. एखादं संकट, आणीबाणीची परिस्थिती आली की अशा लोकांच्या नाकातोंडात पाणी जातं. म्हणुन म्हणतो, नोकरीमधुन मिळणार्याा पगाराव्यतिरिक्त कमाईचं अजुन एक साधन असणं, अत्यंत आवश्यक आहे.
त्यातून मिळणार पैसा योग्य ठिकाणी गुंतवल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा नवा रस्ता सापडतो. मिळालेला पैसा पुन्हा पैसा निर्माण करण्यासाठी वापरला तर खिसा भरलेला राहण्यास नक्कीच उपयोग होतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App