नितीश कुमार एपिसोड मागे कोचिंग माफियांची भीती + राष्ट्रपती पदाची महत्त्वाकांक्षा??


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप यांच्यातली दरी रुंदावल्याच्या बातम्या सध्या ट्रेडिंग आहेत. ही दरी एवढी रुंदावली आहे की कदाचित नितेश कुमार हे भाजपापासून दूर जाऊन काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल यांच्याबरोबर पुन्हा एकदा हात मिळवणे करून नवे सरकार बनवतील.Fear of coaching mafia behind Nitish Kumar episode + Presidential ambition

 मेन स्ट्रीम मीडियाचे आकलन

पण नितेश कुमार यांच्या या राजकीय एपिसोड मागच्या कहाण्या मेन स्ट्रीम मीडिया वेगवेगळ्या सांगतो आहे. नितीश कुमार भाजपपासून नाराज झाल्याचे कारण रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्ष पाडलेल्या फुटीत दाखविण्यात येत आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. नंतर ते तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाला हजर राहिले नव्हते. द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीलाही ते गैरहजर राहिले. एकूण केंद्रातील मोदी सरकार पासून ते फटकून राहत आहेत, असे बातम्यांमध्ये नमूद केले आहे… पण या झाल्या तुलनेने राजकीय दृष्ट्या वरवरच्या बाबी.



 बिहार कोचिंग माफिया हब

प्रत्यक्षात नितीश कुमार आणि भाजप यांच्यातील दरी रुंदावण्याचे कारण उत्तर प्रदेश मधल्या कोचिंग माफियांवर योगी सरकारने मध्यंतरी जो कायद्याचा वरवंटा फिरवला, त्याच्याशी संबंधित आहे. वास्तविक पाहता बिहार हे कोचिंग माफियांचे हब आहे. बिहारमध्ये माफियांना मुक्त रान आहे. तेथे कायद्याचा बडगा नितीश कुमार यांनी त्यांना दाखवलेला नाही. परंतु कोचिंग माफियांमध्ये उत्तर प्रदेशच्या कायदेशीर कारवाईची प्रचंड दहशत आहे आणि कधी ना कधीतरी बिहारमध्ये तसा कायद्याचा बडगा आपल्यावरून फिरू शकतो, अशी कोचिंग माफियांना भीती आहे. नितीश कुमार आणि भाजप यांच्यातली दरी रुंदावण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

 राष्ट्रपती पदाची महत्त्वाकांक्षा

त्याचबरोबर नितीश कुमार यांना याची पूर्ण जाणीव आहे की मुख्यमंत्री म्हणून ही आपली शेवटची टर्म आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रपतीपदी विराजमान व्हायचे होते. यासाठी ते भाजपला ब्लॅकमेल करण्यापर्यंत जाऊन पोहोचले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ऐकले नाही आणि त्यांनी आपल्या राजकीय व्युहरचनेनुसार द्रौपदी मुर्मू यांनाच राष्ट्रपतीपदी निवडून आणले. यामुळे नितीश कुमार यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कायमची कुंठीत झाली. यातून बिहारचे नितीश कुमार भाजप सरकार तुटण्यापर्यंत मजल गेली आहे, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पण या चर्चेकडे मेन स्ट्रीम मीडिया लक्ष देत नाही. राजधानी दिल्लीत मोदी आणि शहा यांनी बोलावलेल्या बैठकांमध्ये नितीश कुमार सहभागी झाले नाहीत, एवढेच रिपोर्टिंग मेन स्ट्रीम मीडियाने केले आहे. पण बिहारचे राजकारण त्यापलिकडेचे आहे आणि मोदी – नितेश कुमार यांची रुंदावलेली दरी अधिक खोलवर आहे.

Fear of coaching mafia behind Nitish Kumar episode + Presidential ambition

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात