वडिलांकडून पोटच्या मुलीवर सात वर्ष बलात्कार, मुलीने शिक्षिकेकडे कैफियत मांडल्यावर प्रकार उघडकीस

विशेष प्रतिनिधी

पुणे : स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने शिक्षिकेकडे याबतची कैफियत मांडल्यावर नराधम बापास अटक करण्यात आली. Father raped his daughter for seven years, arrested by police

किराणा मालाचे दुकान चालवीत असलेल्या व्यापाऱ्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल सात वर्ष लैंगिक अत्याचार केले. या मुलीने शाळेमधील शिक्षिकेकडे विश्वासाने आपली कैफियत मांडल्यानंतर कोंढवा पोलिसांकडे या शिक्षिकेने फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे कोंढव्यामध्ये किराणा मालाचे दुकान आहे. तो मुळचा राजस्थानचा असून पत्नी व मुलांसह पुण्यात राहण्यास आहे. पीडित मुलगी आत्ता 13 वर्षांची असून आरोपी मागील सात वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करीत होता. पीडित मुलगी मागील काही दिवसांपासून शांत शांत आणि घाबरलेल्या अवस्थेत होती. याबाबत तिला शाळेच्या शिक्षिकेने विचारणा केली.



त्या वेळी मुलीने वडिलांकडून मागील सहा वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती दिली. शिक्षिकेने तात्काळ शाळेच्या समुपदेशकांना बोलावून घेतले. या सर्वांनी या मुलीला विश्वासात घेऊन काही गोष्टी जाणून घेतल्या. वडिलांकडून होत असलेले लैंगिक अत्याचार ऐकून समुपदेशक आणि शिक्षिकाही सुन्न झाल्या.

त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करून घेत वडिलांना अटक केली आहे.

पीडित मुलगी सहा वर्षांची होती तेव्हापासून तिचे लैगिक शोषण होत होते. मागील सात वर्षे हा प्रकार सुरू असतानाही पीडित मुलीची आई शांत का होती, तिने पोलिसांकडे तक्रार का केली नाही, या अन्यायाविरुद्ध आवाज का उठवला नाही याची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Father raped his daughter for seven years, arrested by police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात