विशेष प्रतिनिधी
नाशिकः केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरूध्द शेतकरी संघटनेने भारत बंद पुकारला होता. यामुळे बाजार समित्यादेखील बंद होत्या. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये,यासाठी प्रसारमाध्यमे,सोशल मिडीयाद्वारे शेतकरी वर्गापर्यत बंदची माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण सगळ्याच शेतकऱ्यांपर्यत ही माहिती पोहचली नाही. farmers didn’t support bharat bandh
भारत बंद आहे माहितीच नाही
आडगावातील शेतकरी रघुनाथ माळोदे यांना देखील असाच अनुभव आला. यांच्यापर्यत माहितीच पोहोचली नव्हती. शिवाय शेतामध्ये लावलेली कांदापातही विक्रीस काढण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते. त्यामुळे त्यांनी जवळपास तीनशे कांदा पात जुडया शेतामधून काढल्या व भल्या पहाटे दुचाकीहुन बाजार समितीत घेऊन आले. मात्र येथे आल्यावर भारत बंदमुळे बाजार समिती बंद असल्याने त्यांना समजले. आता हा माल विकायचं कसा,असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
अडचणीतून काढला मार्ग
एका पाजूला आंदोलन अन् दुसऱ्या बाजूला हा शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तोडलेली कांदापात विक्रीसाठी धडपडतांना दिसत होता. अखेर त्यांनी दिंडोरी रस्त्यावरच हा माल विक्री करण्याचे ठरवले. पंचवटी ते आडगाव आणि आडगाव ते पंचवटी अशा पाच ते सात चकरा मारत हा सर्व माल त्यांनी विक्री केला.
एका सामान्य शेतकऱ्याची खरी खंत…..
सरासरी दहा रूपयाला एक जुडी विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. ज्याने चोच दिली तो चारा पण देतो. या म्हणीचा प्रत्यय यावेली आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App