कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पंजाबातून आलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या आंदोलनाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची धडपड सुरू झाली आहे. farmer-agitation-news
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पंजाबमधून आलेले शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या आंदोलनाच्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची धडपड सुरू झाली आहे. farmer-agitation-news
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून अरविंद केजरीवाल यांना दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये सत्तेची संधी दिसत होती. पंजाबमध्ये आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीका करताना केजरीवाल म्हणाले की, अमरिंदर सिंग यांना कृषी विधेयकं रोखण्यासाठी अनेकदा संधी आली होती. त्यावेळी त्यांनी ही विधेयकं का रोखली नाहीत? असा सवाल पंजाबची जनता करत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह हे केंद्र सरकारच्या समितीवर होते. समितीमध्ये असताना त्यावेळी या काळ्या कायद्यांना विरोध का केला नाही. त्यांनी तेव्हा ती का रोखली नाहीत?
राष्ट्रपतींनी ज्या दिवशी कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केली तेव्हा त्यांचं कायद्यात रुपांतर झालं. हे कायदे रोखण्याची ताकद कोणत्याही राज्यात नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हे सर्व माहित होतं तर मग त्यांनी आपल्यावर खोटे आरोप का केले? आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही. होऊही देणार नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी आणि एमएसपीवर लेखी हमी द्यावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली.
एकीकडे आम आदमी पार्टी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे, २३ नोव्हेंबरला दिल्लीत केजरीवाल सरकारने कृषी कायदेची लागू करण्याची अधिसूचना जारी केली, अशी टीका करत अमरिंदर सिंग म्हणाले, शेतकरी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची तयारी करत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिसूचना जारी केली आणि राजधानीत अन्नदाताच्या मृत्युच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App