दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. अॅडव्होकेट ओमप्रकाश परिहार यांनी ही याचिका केली आहे. farmer agitation news
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीला कोरोनाचा मोठा धोका आहे. हा धोका ओळखून आंदोलक शेतकऱ्यांना हटवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. farmer agitation news
अॅड. ओमप्रकाश परिहार यांनी ही याचिका केली आहे. परिहार यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, देशात कोरोना महामारी सुरू आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी महामारी कायदा लागू आहे. या परिस्थितीत आरोग्य सेवा आणि आपत्कालीन आरोग्य सेवांना बाधा होईल अशी कोणतीही कृती करण्यास सक्त मनाई असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. farmer agitation news
शेतकरी आंदोलनांवर आरोग्य सेवांवर ताण येत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. कोरोनाचे विषाणू नाकावाटे अथवा तोंडावाटे शरीरात जाण्याचा सर्वाधिक धोरा आहे. या आजारावर अद्याप औषध किंवा लस बाजारात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत गर्दी केल्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमावर्ती भागात प्रचंड गर्दी आहे. पोलिसांना त्यांची इतर कामं सोडून सीमावर्ती भागात बंदोबस्तासाठी रात्रंदिवस उभे राहावे लागत आहे. दिल्लीच्या सीमेवरील प्रचंड गर्दीमुळे दिल्ली तसेच शेजारी राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढून संकटाची तीव्रता वाढण्याचा धोका आहे, अशी चिंता याचिकाकर्ते अॅड. ओमप्रकाश परिहार यांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या संकटाचा विचार करुन आंदोलकांनी मर्यादीत संख्येने आंदोलनासाठी निश्चित असलेल्या ठिकाणी जावे आणि आंदोलन करावे. पण कोरोना संकटाला प्रत्यक्ष अथवा प्रत्यक्षपणे कारणीभूत होऊ नये, अशी भूमिका याचिकाकर्ते अॅड. ओमप्रकाश परिहार यांनी मांडली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App