धनत्रयोदशी : सोने – चांदीच्या दरात घसरण; गुंतवणुकीसाठी उत्तम!!

प्रतिनिधी

मुंबई :  सोने चांदीच्या दरात घसरण गुंतवणुकीसाठी उत्तम!! असे चित्र आज 22 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दिसत आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने – चांदी खरेदी जीवनात फार लाभदायक ठरते, अशी भाविकांचे श्रद्धा असल्याने मोठ्या प्रमाणावर आज सोने-चांदी खरेदी केली जाते. तसेच धान्याचीही खरेदी केली जाते. या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या घरातली घसरण ही गुंतवणुकीसाठी उत्तम असल्याचे मानले जात आहे. Fall in gold-silver prices; Great for investment

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,२५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५६,१५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५६,१५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,४५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६१ रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

Fall in gold-silver prices; Great for investment

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात