नाशिकमध्ये बनावट नोटा छापणारी टोळी जेरबंद; भाजीवालीच्या सतर्कतेमुळे सात जणांना अटक


वृत्तसंस्था

नाशिक : नाशिक पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या सात जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीने नोटा छापण्याचा एक कारखाना सुरु केल्याचे तपासात उघड झाले. त्यांनी किती बनावट नोटा छापल्या आणि किती वितरित केल्या, याचा शोध घेण्याची मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. विशेष म्हणजे एका भाजीवल्या महिलेच्या सतर्कतेमुळे या घटनेचा सुगावा लागला आहे. Fake note printing gang nabbed in Nashik; Seven arrested

कोरोनात बेरोजगारीचं संकट ओढावलं. त्यामुळे या टोळीने चक्क नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापायच्या आणि त्या आदिवासी ग्रामीण भागात खरेदी विक्रीच्या व्यवहारातून चलनात ही टोळी आणत होती.उंबरठाण गावात भाजीविक्रेत्या महिलेला १०० रूपयांची बनावट नोट दिल्याचे लक्षात आले. स्थानिकांनी तिघांन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर निफाड तालुक्यातील विंचुर गावात किरण गिरमेच्या प्रेसमध्ये नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने त्यांनी नोटा छापण्याचा उद्योग सुरू केल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी अटक केलेल्या ,७ जणांकडून ६ लाख १८ हजार २०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

नोटा छापण्याचे साहित्य जप्त

नोटा छापण्यासाठी लागणरे संगणक, प्रिंटर स्कँनर, झेरॉक्स मशीन, मोबाईल , मोटार जप्त केली. तिघांना न्यायालयायीन कोठडी तर उर्वरित आरोपींना पोलिस कोठडी सुनवली आहे. त्यामुळे बनावट नोटा छापून कुठे वितरीत केल्या जात होत्या? किती नोटा चलनात आणल्या आहेत,? रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का? या दिशेने तपास सुरू आहे.

Fake note printing gang nabbed in Nashik; Seven arrested

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण