विशेष प्रतिनिधी
नवी दिल्लीः असं मानतात की जर एखाद्याच्या निधनाची बातमी पसरली आणि ती खोटी ठरली तर त्या व्यक्तीचं आयुष्य वाढतं. आज सुमित्रा महाजन यांचही आयुष्य नक्कीच वाढलं.लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आजारी आहेत. इंदूरच्या माजी खासदार असलेल्या सुमित्रा महाजन यांना तापाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला. त्यांना थोडासा ताप आहे. त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे.
विशेष म्हणजे सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
Thanks @kailashOnline. I have deleted my tweet. I wonder what motivates people to invent and spread such evil news that takes in people. My best wishes for Sumitra ji’s health and long life. — Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
Thanks @kailashOnline. I have deleted my tweet. I wonder what motivates people to invent and spread such evil news that takes in people. My best wishes for Sumitra ji’s health and long life.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी दिली होती. परंतु भाजपचे कैलास विजयवर्गीय यांनी सुमित्राताई स्वस्थ असल्याचं रिट्विट करून त्यांना सांगितलं. त्यानंतर शशी थरूर यांनीसुद्धा सुमित्रा महाजन यांच्या निधनाचं ट्विट डिलीट केलं.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही ट्विटरवर सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याचं सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. पण हे वृत्त खोट असल्याचं समजल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही ट्विट काढून टाकलंय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App