WATCH :मुंबईत बनावट कोरोनाविरोधी लस देणारा भामटा बारामतीमध्ये जेरबंद ; बनावट लसीकरण कॅम्पचा पर्दाफाश


विशेष प्रतिनिधी

बारामती : मुंबईत कोरोनाची लस देण्यासाठी कॅम्प उभारून बनावट लस देणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी शिताफीने बारामतीत अटक केली.Fake corona vaccine in MumbaiGiver arrested in Baramati

राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे हा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून नोकरीस होता. तेव्हा त्याने व त्याच्या साथीदारांनी सिल तुटलेल्या व्हॅक्सीन बाटलीतून भेसळयुक्त लस देऊन लोकांची फसवणणूक केली. त्यासाठी लसीकरण कॅम्प उभारला होता. लसीकरण केलेल्या लोकांना मुंबई मधील वेगवेगळया नामांकित हॉस्पिटलचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक केली. आरोपी हा अमृता लॉज,भिगवण रोड, बारामती या ठिकाणी आढळला.

लवकरच आरोपीला कांदिवली पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.

  •  मुंबईत बनावट लसीकरणाच्या पर्दाफाश
  • सिल तुटलेल्या व्हॅक्सीन बाटलीतून भेसळयुक्त लस
  •  मुंबईत लसीकरण कॅम्प उभारून लोकांना फसविले
  •  राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडेला अटक
  •  हॉस्पिटलमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर
  • नामांकित हॉस्पिटलचे लसीकरण प्रमाणपत्र दिले
  •  माहिती तत्रज्ञान कायद्या अन्वये अटक
  •  बारामतीत पकडले, कांदिवली पोलिसात देणार

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात