द काश्मीर फाईल्स महाराष्ट्रात देखील टॅक्सफ्री करण्यात यावा, अशी मागणी थेट राज्याच्या विधानसभेत देखील करण्यात आली.मात्र यावर उपमुखयमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट नकार दिला .
विशेष प्रतिनिधी
मुंबई : द काश्मीर फाईल्स जवळपास सर्वच राज्यात करमुक्त करण्यात येतोय याला अपवाद म्हणजे महाराष्ट्र .ठाकरे पवार सरकारचने देखील हा सिनेमा करमुक्त करावा अशी मागणी अख्खा महाराष्ट्र करत आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे . त्यावरून भाजपाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला असून बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण देखील करून दिली आहे.Face to face: Sanjay Raut thinks the Kashmir files are ‘untrue’! Ajit Pawar refuses to be tax free; Fadnavis said did you ever go to Kashmir? .. reminded Balasaheb ….
कश्मीर फाईल्स चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची मागणी फेटाळताना अजित पवारांनी केंद्र सरकारने हा चित्रपट करमुक्त केल्यास संपूर्ण देशातच तो करमुक्त होईल, असं उडवाउडवीचं उत्तर दिलं. यावरून विरोधकांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
संजय राऊत काय म्हणाले ?
दरम्यान, “चित्रपट टॅक्सफ्री करून वेदना दाखवता येत नाहीत”, अशा शब्दांत या प्रकरणावर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे .
काय म्हणाले फडणवीस?
“महाराष्ट्र सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली आहे. काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचं उद्धव ठाकरेंच्या सरकारचं वर्तन यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काश्मीरची काय अवस्था होती, हे ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे.
मी स्वत: वयाच्या १८व्या वर्षी मी काश्मीरला गेलो होतो. तिथली दैना मी बघितली आहे. ज्या प्रकारे तिथे अत्याचार झालेत, ते मीही जवळून बघितलं आहे. असं देशातलं सत्य एखाद्या सिनेमामुळे समोर येत असेल, तर काही लोकांना मिर्ची का लागते? ती यासाठी लागते की त्या वेळची त्यांची भूमिका ही किती संशयास्पद होती, जनविरोधी होती, देशविरोधी होती याचा पर्दाफाश होतो”.
“संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे? ते कधी काश्मीरमध्ये गेले होते का? या संघर्षाच्या काळात ते कधीच काश्मीरला गेले नाहीत. सत्य पहिल्यांदा बाहेर येतंय तर येऊद्या ना .तुम्हाला का मिरची लागते .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App