विशेष प्रतिनिधी
चेन्नई : इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीबाबत बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. यावरुन नसरीन यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आता इंग्लंडचे क्रिकेटपटू देखील मोइन अलीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. Face-to-face: Controversial tweet of writer Taslima Nasreen about Moin Ali erupts Joffra Archer
Are you okay ? I don’t think you’re okay https://t.co/rmiFHhDXiO — Jofra Archer (@JofraArcher) April 6, 2021
Are you okay ? I don’t think you’re okay https://t.co/rmiFHhDXiO
— Jofra Archer (@JofraArcher) April 6, 2021
बांगलादेशी लेखिका तस्लीमा नासरीन यांनी इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे. “मोईन अली क्रिकेटमध्ये अडकला नसता, तर तो आयसीसमध्ये सामील होण्यासाठी सिरियाला गेला असता”, असे ट्विट नासरीन यांनी केले होते. या ट्विटनंतर नासरीन यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. अनेकांनी त्यांच्या या ट्विटला तिखट उत्तर दिले. आता मोईन अलीचा संघसहकारी आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने नासरीन यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.
“तुम्ही ठीक आहात? मला, वाटत नाही, की तुम्ही ठीक आहात”, असे आर्चरने नासरीन यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
तस्लीमा नसरीन यांनीही मोईन अलीबाबतच्या ट्विटवरुन जोरदार टीका होत असल्याचं लक्षात येताच आणखी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिले. विनोद शैलीतून मोईन अलीबाबतचे ट्विट केले होते. पण माझ्या विरोधकांनी त्याचा वाद निर्माण केला. माझ्याबद्दल समाजात घृणा निर्माण व्हावी यासाठीच ते प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण तस्लीमा नसरीन यांनी दिले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने त्यावर तस्लीमा नसरीन यांच्यावर संताप व्यक्त करत जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
तुम्हाला हा खरंच जोक वाटतो का? यावर कुणीच हसले नाही. या विनोदावर तुम्ही स्वत: देखील हसला नसाल. तर आता कृपा करुन ते ट्विट सर्वात आधी डिलीट करा, असे ट्विट जोफ्रा आर्चरने केले आहे.
Haters know very well that my Moeen Ali tweet was sarcastic. But they made that an issue to humiliate me because I try to secularize Muslim society & I oppose Islamic fanaticism. One of the greatest tragedies of humankind is pro-women leftists support anti-women Islamists. — taslima nasreen (@taslimanasreen) April 6, 2021
Haters know very well that my Moeen Ali tweet was sarcastic. But they made that an issue to humiliate me because I try to secularize Muslim society & I oppose Islamic fanaticism. One of the greatest tragedies of humankind is pro-women leftists support anti-women Islamists.
— taslima nasreen (@taslimanasreen) April 6, 2021
नासरीन यांचे स्पष्टीकरण
“हे ट्विट उपहासाने केले गेले होते, हे टीकाकारांना चांगलेच ठाऊक आहे. परंतु त्यांनी मला अपमानित करण्याचे ठरवले, कारण मी मुस्लिम समाज सेक्युलर करण्याचा प्रयत्न करते आणि मी इस्लामिक धर्मांधतेला विरोध करते. मानवजातीची ही एक सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, की स्त्रीवादी डावे स्त्रीविरोधी इस्लामवाद्यांना पाठिंबा देत आहेत”, असे तस्लीमा नासरीन यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे.
कोण आहे मोईन अली?
मोईन अली हा इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. सध्या तो आयपीएलच्या तयारीत व्यस्त असून यंदा तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी अलील बंगळुरू संघाचा भाग होता. 2021च्या लिलावात चेन्नईने त्याला 7 कोटींमध्ये संघात घेतले.
तस्लीमा नसरीन यांच्या या वक्तव्यावर इंग्लंडचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) टीका केली. ‘तू बरी आहेस का? मला तरी तू बरी वाटत नाहीस. उपरोधिक? या ट्वीटवर कोणीही हसत नाहीये, तू देखील नाही. कमीत कमी तू हे ट्वीट डिलीट करू शकतेस,’ असं जोफ्रा आर्चर म्हणाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App