विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले खरे… पण ते थोडाच वेळ टिकले. कारण नंतर कोरोना परिस्थितीचे कारण पुढे करत काँग्रेसच्या अध्यक्षांच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढे ढकलल्याचे जाहीर करण्यात आले. Elections for Congress President further postponed. Due to COVID19 situation
नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सोनिया गांधी यांनी घेतली. यामध्ये काँग्रेसच्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने घेतला. आसाम आणि केरळमधील पराभव तसेच पश्चिम बंगालमध्ये पक्षाला मिळालेल्या शून्य जागा अत्यंत निराशाजनक असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.
जून २०२१ अखेरीस काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याबाबतची माहिती त्यांनी बैठकीत दिली. पण लगेच काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणूकीचे मुख्य अधिकारी मधुसुदन मिस्त्री यांनी तयार केलेला कार्यक्रम काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी वाचून दाखविला. तो अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्याचा एका ओळीचा प्रस्ताव होता. सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे, असे या प्रस्तावाद्वारे जाहीर करण्यात आले.
The next schedule will be decided by the Congress' Central Election Authority: Sources — ANI (@ANI) May 10, 2021
The next schedule will be decided by the Congress' Central Election Authority: Sources
— ANI (@ANI) May 10, 2021
सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, आनंद शर्मा यांच्यासह काँग्रेस कार्यकारिणीचे इतर सदस्य या ऑनलाईन बैठकीला हजर होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App