विशेष प्रतिनिधी
जळगाव : माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर पतसस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा सुरु केला आहे. ज्याप्रमाणे नाथाभाऊंनी बीएचआरच्या प्रकरणावरून इतरांना टार्गेट करायला सुरवात केले आहे. दुसरीकडे वरणगाव येथील श्री.एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी आवाज उठवून त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी ठेवीदार आक्रमक झाले आहे. आपल्या ठेवी कोणत्याही परिस्थितीत परत मिळाल्याच पाहिजे,अशी ते मागणी करू लागले आहे. eknath khadse news
याबाबत माहिती दिपककुमार गुप्ता यांनी दिली. रघुनाथ चौधरी व यादव जगन्नाथ पाटी लयांनी गावातील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्थेत २००६ मध्ये ठेवी ठेवल्या होत्या. मात्र ही पतसंस्था बुडाली असून यात अनेकांच्या ठेवी बुडालेल्या आहे. ठेवींबाबत यादव पाटील यांनी काही वर्षापुर्वी श्री.खडसेंची भेट घेतली होती. त्यावेळी श्री.खडसे म्हणाले होते की मी नाही बोललो होतो मात्र तरी देखील माझे नाव पतसंस्थेला दिले.माझा या पतसंस्थेशी काहीही संबंध नाही. eknath khadse news
अनेकांच्या ठेवी बुडाल्या
यादव पाटील यांनी एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्था धनवर्धीनी सहकारी पतसंस्था मर्यादित, महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी,लोककल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित याठिकाणी ठेवी ठेवल्या होत्या,पण अद्याप त्यांना कुठल्याच पतसंस्थेकडून ठेवी परत मिळाल्या नाहीत. त्यामुळे नाथाभाऊंनी बीएचआरप्रमाणे या पतसंस्थाचा देखील पाठपुरावा करावा. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून न्याय मिळवून देण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे.
एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था ही दुसऱ्याच संचालकांनी सुरु केली असून याचा नाथाभाऊंशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. यांच्याशी खडसे यांचा थेट संबंध असो वा नसो आपल्याला यांच्याशी काही देणे-घेणे नाही. तथापि आपल्या नावाने पतसंस्था असल्याने खडसे यांनी ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गुप्ता यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App