विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – सोने खरेदीत ‘एमएमटीसी’ची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने हैदराबाद येथील नामांकित दागिन्यांची कंपनी ‘एमबीएस’ची ३६३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ED attaches 360 Cr property of company
मबीएस ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, एमबीएस इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक सुकेश गुप्ता, अनुराग गुप्ता, नीतू गुप्ता, वंदना गुप्ता आणि त्याच्या अन्य सह समूहाची एकूण ४५ अचल मालमत्ता २६ ऑगस्टला पीएमएलए कायद्यांतर्गत जप्त केल्याचे ईडीने म्हटले आहे. या मालमत्तेची किंमत ३६३ कोटी रुपये इतकी आहे.
हैदराबाद येथे सीबीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने २०१४ रोजी एमबीएस समूहाचे संचालक सुकेश गुप्ता आणि अन्य सहकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. सुकेश गुप्ता यांनी एमएमटीसी (मेटल्स ॲड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन )च्या अधिकाऱ्यांसमवेत मिलीभगत करून कोणतेही फॉरेक्स हमी नसताना ‘बायर्स क्रेडिट स्कीम’ तंर्गत सोने खरेदी केले. एवढेच नाही तर गुप्ता यांनी हमीपोटी रक्कमही भरलेली नव्हती आणि सोने खरेदीचा सपाटा लावला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App