वृत्तसंस्था
नवी दिल्ली – शेअर ब्रोकरेज कंपनी कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडवर कारवाई करीत ईडीने कंपनीच्या नावावरील ७०० कोटींचे शेअर गोठविले आहेत. कार्वी कंपनीने आपल्या ग्राहकांचे शेअर गहाण ठेवून ३२९ कोटीचे कर्ज घेतले आणि ते अन्य ठिकाणी वापरले आहे.ED attached shares of Karvy
ईडीने २२ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे सहा ठिकाणी कार्वी समूहाच्या ठिकाणांवर छापे घातले होते. ईडीने दिलेल्या निवेदनानुसार, मुख्य कार्यकारी संचालक पार्थसारथी यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधी घरावर छापे घातले. या ठिकाणी कागदपत्रे, रोजनिशी, ई-मेल जप्त करण्यात आले. पार्थसारथी हे कार्वी कंपनीचे शेअर साटेलोटे करून विक्री करण्याचा प्रयत्न करणार होते. याचा संशय आल्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत ते सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व शेअर गोठवण्यात आले. या शेअरची किंमत ७०० कोटी रुपये असू शकते.
कार्वी समूहाच्या या शेअरवर सी.पार्थसारथी आणि त्यांची मुले रजत आणि अधिराज यांचा मालकी हक्क आहे. पार्थसारथी यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App