अशी असेल दिल्लीत धावलेली चालक विरहित मेट्रो… अत्याधुनिक वाहतूक तंत्रज्ञानात भारत बनला आत्मनिर्भर!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीत चालकविरहित मेट्रो प्रथमच धावली आणि मेट्रो वाहतुकीच्या क्षेत्रात एका अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आपला झेंडा रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविलेली ही चालक विरहित मेट्रो कशी आहे त्यावर टाकलेला हा प्रकाशझोत… Driverless metro running in Delhi

  • देशातील मुख्य शहरात सुरक्षित आणि जलद प्रवासी वाहतुकीचे जाळे निर्माण कारण्यासाठी मेट्रोसेवा सुरु केली होती.
  • दिल्लीला मेट्रोसेवा सुरु करण्याचा पहिला मान मिळाला. आता दिल्लीत चक्क चालकविरहित मेट्रो धावत आहे.
  • दिल्ली मेट्रोच्या मॅग्नेटा लाईनवर ही सेवा सुरू होणार असून ती पश्चिम जनकपुरी आणि नोएडा बोटॅनिकल गार्डन लाईनला जोडणार आहे.
  • दिल्ली मेट्रोच्या 20 किलोमीटरच्या पिंक लाईनवर 2017 मध्ये चलकविरहित मेट्रोच्या चाचण्या घेण्यास सुरुवात झाली. यामध्ये अनटेंडेड ट्रेन ऑपरेशन्स (यूटीओ) आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिग्नलिंग सिस्टमचा समावेश होता.

Driverless metro running in Delhi

  •  स्वयंचलित गाड्या फक्त लाइन 7 आणि 8 वर धावतील. कारण ड्रायव्हरलेस ट्रेन ऑपरेशन (डीटीओ) किंवा अनॅटेंडेड ट्रेन ऑपरेशन (यूटीओ) मोड येथेच आहेत. प्रगत सिग्नलिंग तंत्रज्ञानाने त्या सुसज्ज आहेत. पहिली चालक विरहित मेट्रो लाइन 7 वर धावेल.
  •  कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय तीन कमांड सेंटर वरून मेट्रो लपूर्णपणे नियंत्रित केली जाईल. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिग्नलिंग टेक्नॉलॉजीमुळे ट्रेनच्या ऑपरेशनच्या प्रत्येक बाबीचे दूरून देखरेख करणे आणि समस्यानिवारण करणे शक्य होईल. हार्डवेअर बदलण्यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक असेल.
  • कमांड आणि कंट्रोल केंद्रावर प्रवाशांच्या संख्येची माहिती गोळा केला जाईल. तसेच गर्दीवर सीसीटीव्हीने लक्ष ठेवले जाईल. प्राप्त माहितीच्या आधारे गर्दीबाबतचा आदेश नियंत्रकांना दिला जाईल.
  • दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने संपूर्ण यंत्रणेची तपासणी आणि आढावा घेण्यासाठी सल्लागार, सिस्ट्रा एमव्हीए आणि सिस्ट्रा फ्रान्सचा एक सल्लागाराची मदत घेतली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*