विशेष प्रतिनिधी
डोंबिवली जवळील उंबर्ली हे गाव कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र आता डोंबिवलीतील पेंडसे नगर परिसरात एक पांढऱ्या रंगाचा कावळा वावरताना नागरिकांना आढळून आल्याने सर्वाना आश्चर्य वाटत आहे. डोंबिवली पूर्वेकडील महेश वीला, आंध्र बँक जवळ सायंकाळी अचानक पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. तेव्हा हितेश शहा नावाच्या युवकाने जखमी अवस्थेत पांढऱ्या रंगाचा कावळा आढळून आला. त्यांनी पॉज हेल्पलाईनला फोन करून सांगितले असता संस्थेचे निलेश भणगे यांनी त्वरित धाव घेत पांढऱ्या रंगाचा कावळ्याला वाचवत त्याला मुरबाड येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले आहे.
– डोंबवलीत आढळला पांढरा कावळा
– पेंडसेनगरच्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का
– युवक हितेश शहा याला तो दिसला
– कावळा जखमी झाला होता
-पॉज हेल्पलाईनला फोन करून सांगितले
-मुरबाड येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App